15 हजार कमावणाऱ्याला सरकार दरवर्षी देणार 36 हजार पेन्शन, वाचा या योजनेबद्दल

15 हजार कमावणाऱ्याला सरकार दरवर्षी देणार 36 हजार पेन्शन, वाचा या योजनेबद्दल

जर तुमची कमाई 15 हजारांपेक्षा कमी आहे आणि तुमचा निवृत्तीनंतर कोणतीही योजना नाही आहे, तर मोदी सरकारची ही योजना तुमच्या फायद्याची ठरू शकते.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 ऑगस्ट : जर तुमची कमाई 15 हजारांपेक्षा कमी आहे आणि तुमचा निवृत्तीनंतर कोणतीही योजना नाही आहे, तर मोदी सरकारची ही योजना तुमच्या फायद्याची ठरू शकते. यामध्ये 60 वर्षानंतर प्रत्येक महिन्याला 3 हजार या हिशोबाने वार्षिक 36 हजार रुपये मिळतील. या योजनेमध्ये 18 ते 40 वयोगटातील नागरिक जोडले जाऊ शकतात. या योजनेचे नाव आहे पीएम श्रम योगी मानधन योजना (Pradhan Mantri Shram Yogi Maandhan Yojana, PM-SYM).

55 रुपये योगदान देऊम मिळवा 3000 रुपये पेन्शन

या योजनेमध्ये वेगवेगळ्या वयाच्या हिशोबाने 55 ते 200 रुपये महिना अशाप्रकारे योगदान करण्याचा पर्याय आहे. 18व्या वर्षी तुम्ही या योजनेशी जोडले गेलात तर महिन्याला 55 रुपयाचे योगदान द्यावे लागेल. जर तुम्ही तिसाव्या वर्षी या योजनेशी जोडले गेलात तर 100 रुपये आणि 40व्या वर्षी तुम्ही या योजनेशी जोडले गेलात तर 200 रुपयाचे योगदान द्यावे लागेल.

(हे वाचा-Be Like Binod : ऑनलाइन फ्रॉडबाबत SBIचा हटके अलर्ट, ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना)

अठराव्या वर्षी या योजनेमध्ये तुम्ही पैसे गुंतवण्यास सुरुवात केल्यास तुम्हाला वार्षिक 660 रुपये द्यावे लागतील. असे एकूण 42 वर्षांसाठी तुम्हाला 27,720 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. त्यानंतर वयाच्या साठाव्या वर्षानंतर तुम्हाला मासिक 3000 रुपये पेन्शन आजीवन मिळेल. जे योगदान खातेधारक करेल, तेवढेच योगदान सरकारकडून देखील करण्यात येते.

कुणाला सुरू करता येईल PMSYM मध्ये खाते?

मोदी सरकारने (Modi Government) गेल्या वर्षी असंगठित कामगारांसाठी पंतप्रधान श्रमयोगी योजनेची सुरूवात केली होती. या योजनेमध्ये असंगठित क्षेत्रामध्ये काम करणारी कोणतीही व्यक्ती जोडली जाऊ शकते. या व्यक्तीचे वय 18 ते 40 वर्षांदरम्यान असणे बंधनकारक आहे त्याचप्रमाणे त्याचे मासिक उत्पन्न 15000 पेक्षा कमी असणे गरजेचे आहे. जर तुमचे EPF/NPS/ESIC मध्ये आधीपासूनच खाते असेल, तर याठिकाणी तुम्हाला खाते उघडता येणार नाही. त्याचप्रमाणे तुमचे उत्पन्न करयोग्य देखील नसले पाहिजे.

कसे सुरु कराल या योजनेत खाते?

पंतप्रधान श्रमयोगी मानधन पेन्शन योजनेमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला जवळच्या CSC सेंटरमध्ये जावे लागेल. त्यानंतर हे खाते सुरु करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, बँक डिटेल्स (बचत किंवा जनधन खात्याची माहिती) द्यावे लागतील. यासाठी तुम्हाला पासबुक/चेकबुक/बँक स्टेटमेंट द्यावे लागेल. तुमची माहिती संबधित अधिकाऱ्यांनी भरून घेतल्यानंतर तुम्हाला मासिक किती पैसे भरावे लागतील याची माहिती मिळेल. त्यानंतर सुरुवातीचे योगदान तुम्हाला रोख रकमेच्या स्वरूपात द्यावे लागेल.

(हे वाचा-कोरोनाचा मोठा फटका! यावर्षी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार केवळ एवढीच वाढ)

त्यानंतर तुमचे खाते बनवण्यात येईल आणि तुम्हाला श्रमयोगी कार्ड देखील मिळेल. 1800 267 6888 या टोल फ्री क्रमांकावर तुम्ही योजनेची अधिक माहिती मिळवू शकता

जर तुम्ही एखाद्या महिन्याचे योगदान भरले नाही तर त्या रकमेबरोबर व्याज देखील द्यावे लागेल. त्यानंतर सामान्य पद्धतीने तुमचे योगदान सुरू होईल. जर या योजनेशी जोडले गेल्याच्या तारखेनंतर 10 वर्षांच्या आतमध्ये पैसे काढायचे असतील तर तुम्हाला तुमचे पैसे बचत खात्य़ाच्या व्याजदराप्रमाणे परत करण्यात येतील

Published by: Janhavi Bhatkar
First published: August 13, 2020, 9:03 AM IST

ताज्या बातम्या