Home /News /money /

महागाईचा झटका! साबण-डिटर्जंट 20% पर्यंत महागले, गव्हाचे पीठ आणि तांदळाचे दरही वधारले

महागाईचा झटका! साबण-डिटर्जंट 20% पर्यंत महागले, गव्हाचे पीठ आणि तांदळाचे दरही वधारले

सातत्याने वाढणारी महागाई (Inflation 2022) सामान्यांच्या आर्थिक बजेटचं कंबरडं मोडणारी ठरत आहे. या दरम्यान हिंदुस्तान यूनिलिव्हरने (Hindustan Unilever) देखील साबण आणि डिटर्जेटच्या किमती वाढवून सामान्यांना झटका दिला आहे.

    मुंबई, 13 जानेवारी: सातत्याने वाढणारी महागाई (Inflation 2022) सामान्यांच्या आर्थिक बजेटचं कंबरडं मोडणारी ठरत आहे. या दरम्यान हिंदुस्तान यूनिलिव्हरने (Hindustan Unilever) देखील साबण आणि डिटर्जेटच्या किमती वाढवून सामान्यांना झटका दिला आहे. देशातील या सर्वात मोठ्या एफएमसीजी कंपनी (FMCG Company) ने साबण आणि डिटर्जेंटच्या किमतीत 20 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. यामुळे HUL चे व्हील, रिन, सर्फ एक्सेल आणि लाइफबॉय या रेंजचे प्रोडक्ट्स महागले आहेत. एचयूएलच्या मते, कच्च्या मालासाठी वाढणाऱ्या खर्चामुळे आता त्याचा भार ग्राहकांवर टाकणे आवश्यक बनले आहे. त्यामुळे या प्रोडक्ट्सच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इनपुट कॉस्ट (Input Cost) वाढल्यामुळे कंपनीला गेल्यावर्षी देखील काही दरात वाढ करावी लागली होती. Surf Excel बारच्या किमती सर्वाधिक वाढल्या या कंपनीने Surf Excel बारच्या किमती सर्वाधिक वाढवल्या आहेत. या साबणाचे दर 20 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. यामुळे हा साबण आधीच्या तुलनेत 2 रुपयांनी वाढला आहे. यामुळे सर्फ एक्सल बारची किंमत आता 10 रुपयांवरुन 12 रुपये झाली आहे. हे वाचा-इंधनाच्या दरात आज काय झाला आहे बदल? वाचा काय आहे 1 लीटर पेट्रोलचा भाव पीअर्स साबण 7 रुपयांनी महागला, रिनचे बंडल आता 76 रुपयांना एचयूएलने पीअर्स साबणाच्या 125 ग्रॅम बारच्या किमतीत 7 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे पीअर्स साबणाचे दर 76 रुपयांवरुन वाढून 83 रुपये झाले आहेत. याशिवाय लाइफबॉयच्या 125 ग्रॅम पॅकची किंमत 29 रुपयांवरुन 31 रुपये झाली आहे. याशिवाय रिनचे बंडल (चार 250 ग्राम बारचे) 72 रुपयांवरुन 76 रुपये झाले आहे. रिनच्या 250 ग्रॅमच्या सिंगल बारची किंमत 18 रुपयांवरुन 19 रुपये करण्यात आली आहे. गव्हाचे पीठ (आटा) आणि बासमती तांदूळ महागला >> अडानी विल्मर (Adani Wilmar) ने देखील जानेवारी 2022 मध्ये पॅकेज्ड गव्हाच्या पीठाचे दर 5-8 टक्के आणि बासमीत तांदळाचे दर 8-10 टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली होती. याचे मुख्य कारण खर्चात झालेली वाढ आहे हे वाचा-नोकरीचं फार टेन्शन नको; फक्त 20 हजारात सुरू करा हा व्यवसाय, 4 लाखांपर्यंत कमवाल >> पार्ले प्रोडक्ट्स (Parle Products) देखील मार्च तिमाहीमध्ये त्यांच्या प्रोडक्ट्सचे दर 4-5 टक्क्यांनी वाढवू शकतात. कंपनीने ऑक्टोबर-डिसेंबर 2021 तिमाहीतही दर वाढवले होते. >> डाबर इंडिया (Dabur India) ने डिसेंबर 2021 मध्ये असे म्हटले होते की ते महागाईच्या स्थितीची पर्यवेक्षण करत आहेत. जर महागाईची स्थिती अशीच राहिली तर चौथ्या तिमाहीत दरात वाढ केली जाऊ शकते.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Inflation, Money

    पुढील बातम्या