Home /News /money /

Business Idea: नोकरीचं फार टेन्शन घेऊ नका; फक्त 20 हजारात सुरू करा हा व्यवसाय, 4 लाखांपर्यंत कमवाल

Business Idea: नोकरीचं फार टेन्शन घेऊ नका; फक्त 20 हजारात सुरू करा हा व्यवसाय, 4 लाखांपर्यंत कमवाल

Business Idea: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनीही 'मन की बात'मध्ये (Mann Ki Baat) या व्यवसायाचा उल्लेख केला आहे. पीएम मोदी म्हणाले की, या शेतीमुळे शेतकरी स्वत: सक्षम होत असून देशाच्या प्रगतीतही योगदान देत आहेत.

    नवी दिल्ली, 12 जानेवारी : तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल, तर आज आम्ही तुम्हाला एक नवी कल्पना देत आहोत. हा व्यवसाय तुम्ही माफक गुंतवणूक करून सुरू करू शकता. गवती चहाच्या शेतीचा (लेमन ग्रास फार्मिंग - Lemon Grass Farming) व्यवसाय तुम्ही करू शकता. गवती चहाला 'लेमन ग्रास' (Lemon Grass) असंही म्हणतात. या शेतीतून केवळ एका हेक्टरमधून तुम्ही एका वर्षात सुमारे 4 लाख रुपयांचा नफा कमवू शकता. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनीही 'मन की बात'मध्ये (Mann Ki Baat) या व्यवसायाचा उल्लेख केला आहे. पीएम मोदी म्हणाले की, या शेतीमुळे शेतकरी स्वत: सक्षम होत असून देशाच्या प्रगतीतही योगदान देत आहेत. अनेक प्रकारची उत्पादने तयार केली जातात गवती चहापासून काढलेल्या तेलाला बाजारात मोठी मागणी आहे. यापासून काढलेलं तेल सौंदर्यप्रसाधनं, साबण, तेल आणि औषधं बनवणाऱ्या कंपन्या वापरतात. त्याला बाजारात चांगला भाव मिळतो. या लागवडीची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही वनस्पती दुष्काळग्रस्त भागातही लावता येते. या शेतीमध्ये ना खताची गरज आहे ना वन्य प्राण्यांनी पिकाची नासधूस करण्याची भीती आहे. यामुळं हे पीक फायदेशीर ठरत आहे. पेरणीनंतर 5-6 वर्षं याचं पीक सतत चालू राहतं. हे वाचा - लघवीच्या समस्येशिवाय किडनी खराब होण्याची अशी असतात लक्षणं; त्याकडे दुर्लक्ष पडेल महागात गवती चहाची लागवड सोपी, जाणून घ्या याविषयी गवती चहा लावण्यासाठी सर्वोत्तम वेळ फेब्रुवारी ते जुलै दरम्यान आहे. एकदा लागवड केल्यावर सहा ते सात वेळा कापणी केली जाते. कापणी वर्षातून तीन ते चार वेळा केली जाते. गवती चहापासून तेल काढलं जातं. याच्या विक्रीचा दर 1,000 ते 1,500 रुपये लिटर आहे. त्याची पहिली कापणी लागवडीनंतर 3 ते 5 महिन्यांनी केली जाते. हे वाचा - Career Tips: स्वतःसोबत दुसऱ्यांनाही ठेवा निरोगी; असे व्हा फिटनेस ट्रेनर; कमवा भरघोस पैसे गवती चहा तयार आहे की नाही, हे समजण्यासाठी त्याचं पान तोडून त्याचा वास घ्या. जर तुम्हाला लिंबासारखा तीव्र वास आला, तर गवती चहा कापणीसाठी तयार असल्याचं समजा. जमिनीपासून 5 ते 8 इंच वर कापणी करावी. याची उत्पादन क्षमता तीन वर्षांपर्यंत वाढते. गवती चहाची रोपवाटिका तयार करण्याचा उत्तम काळ म्हणजे मार्च-एप्रिल महिना.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Business, Small business

    पुढील बातम्या