Home /News /money /

Petrol Diesel Prices Today: इंधनाच्या दरात आज काय झाला आहे बदल? वाचा काय आहे 1 लीटर पेट्रोलचा भाव

Petrol Diesel Prices Today: इंधनाच्या दरात आज काय झाला आहे बदल? वाचा काय आहे 1 लीटर पेट्रोलचा भाव

Petrol Diesel Prices Today: राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा भाव (Petrol Price) 95.41 रुपये प्रति लीटर आहे. तर डिझेल 86.67 रुपये प्रति लीटरवर आहे. मुंबईत पेट्रोलचा भाव 109.98 रुपये तर डिझेलचा भाव 94.14 रुपये प्रति लीटर आहे. जाणून घ्या काय आहे महाराष्ट्रातील इतर शहरातील इंधनाचा भाव

पुढे वाचा ...
    मुंबई, 13 जानेवारी: आज गुरुवारी देखील पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल (IOCL) ने पेट्रोल-डिझेलचे नवीन दर (Petrol Diesel Price Today 13th January 2022) जारी केले आहेत. नवीन दरानुसार देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 95.41 रुपये प्रति लीटर आणि डिझेलचे दर 86.67 रुपये प्रति लीटरवर स्थिर आहेत.  मुंबईत पेट्रोलचा भाव 109.98 रुपये तर डिझेलचा भाव 94.14 रुपये प्रति लीटर आहे. अशाप्रकारे घरबसल्या तपासा इंधनाचे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (How to check diesel petrol price daily) च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. इंडियन ऑइलचे कस्टमर 92249 92249 वर SMS पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. एचपीसीएल कस्टमर HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घेऊ शकतात. हे वाचा-पेटीएमच्या शेअरची घसरगुंडी, गुंतवणूकदारांचं तब्बल 'इतक्या' रुपयांचं नुकसान महाराष्ट्रातील इंधनाचा भाव मुंबईत पेट्रोल-डिझेलचा भाव स्थिर असून गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल 109.98 रुपये तर डिझेलचा भाव 94.14 रुपये प्रति लीटर आहे. महाराष्ट्रातील इतर शहरातही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. पुण्यामध्ये पेट्रोलचे दर 110.19 रुपये प्रति लीटरवर आहेत, तर डिझेल 92.96 रुपये प्रति लीटरवर आहे. महाराष्ट्रात सर्वात महाग पेट्रोल परभणीमध्ये मिळते आहे. जाणून घ्या महाराष्ट्रातील इतर शहरात इंधनाचा दर काय आहे.
    शहरपेट्रोलचा भाव (प्रति लीटर)डिझेलचा भाव (प्रति लीटर)
    पुणे110.19 रुपये92.96 रुपये
    मुंबई109.98 रुपये94.14 रुपये
    नाशिक110.13 रुपये92.90 रुपये
    नागपूर109.70 रुपये92.52 रुपये
    अहमदनगर109.55 रुपये92.35 रुपये
    औरंगाबाद110.66 रुपये93.41 रुपये
    रत्नागिरी111.56 रुपये94.27 रुपये
    रायगड109.46 रुपये92.23 रुपये
    परभणी113.19 रुपये95.84 रुपये
    पालघर109.63 रुपये92.39 रुपये
    सांगली109.65 रुपये92.47 रुपये
    कोल्हापूर111.10 रुपये93.86 रुपये
    सकाळी 6 वाजता बदलतात इंधनाचे दर दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol Diesel hike

    पुढील बातम्या