Home /News /money /

Gold Price Update : सोनं खरेदीची सध्या उत्तम संधी; येत्या काळात सोन्याच्या दरात 'या' कारणांमुळे वाढ होण्याची शक्यता

Gold Price Update : सोनं खरेदीची सध्या उत्तम संधी; येत्या काळात सोन्याच्या दरात 'या' कारणांमुळे वाढ होण्याची शक्यता

Gold Price: जाणकारांचे म्हणणे आहे की लग्नाचा हंगाम सुरू होताच सोन्याची मागणी वाढेल, त्यामुळे त्याच्या किमती वाढू शकतात. भविष्यात, एमसीएक्सवर सोने 53,500 रुपयांपर्यंत पोहोचू शकते आणि मध्यम कालावधीत ते 56,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

पुढे वाचा ...
    मुंबई, 10 एप्रिल : देशात लग्नसराईचा हंगाम सुरू होणार आहे. याआधी, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव (Gold Price) 52099 रुपये प्रति 10 ग्रॅमचा उच्चांक गाठला आहे. स्पॉट गोल्डही 0.77 टक्क्यांनी वाढून 1945 डॉलर प्रति औंसवर बंद झाले. MCX वर गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतीत सुमारे 0.90 टक्क्यांनी वाढ झाली. लाइव्ह मिंटच्या मते, अमेरिकन फेड रिझर्व्हच्या (Bank Of America) व्याजदरात वाढ करण्याच्या अंदाजामुळे सोन्याने अलीकडच्या आठवड्यात कन्सॉलिडेशन झोन गाठले आहे, असे कमोडिटी मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia-Ukraine War) सोन्याच्या भावाला आधार मिळत आहे. जाणकारांचे म्हणणे आहे की लग्नाचा हंगाम सुरू होताच सोन्याची मागणी वाढेल, त्यामुळे त्याच्या किमती वाढू शकतात. भविष्यात, एमसीएक्सवर सोने 53,500 रुपयांपर्यंत पोहोचू शकते आणि मध्यम कालावधीत ते 56,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकते. Personal Loan की Gold Loan तुमच्यासाठी कोणतं फायदेशीर? दोघांमधील फरक समजून घ्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर लक्ष ठेवणार रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेडच्या उपाध्यक्षा (कमोडिटी अँड करन्सी रिसर्च) सुगंधा सचदेवा सांगतात की, सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांची नजर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर आहे. मार्चमध्ये फेडरल रिझर्व्हच्या बैठकीत असे सूचित केले होते की ते येत्या काही महिन्यांत व्याजदर वाढवू शकतात. अमेरिकेतील वाढती महागाई हे त्याचे प्रमुख कारण आहे. मात्र चलनविषयक धोरणाच्या तीव्र कडकपणामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला सर्वात जास्त त्रास होईल. यामुळे जागतिक अर्थव्यवस्था रुळावर येऊ शकते. वाढीच्या कोणत्याही नकारात्मकतेच्या जोखमीमुळे दीर्घकालीन सोन्याची घसरण होऊ शकते. भूराजकीय तणाव वाढण्याची शक्यता असल्याचे सचदेवा यांचे म्हणणे आहे. अमेरिका आणि युरोप रशियावर नवीन निर्बंध घालण्याची योजना आखत आहेत. त्यामुळे तणाव आणखी वाढू शकतो. जागतिक चलनवाढीचा दबाव वाढीच्या मार्गावर येण्यास बराच वेळ लागू शकतो. या घडामोडींमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यात गुंतवणूक वाढू शकते. याचा परिणाम किमतींवरही होणार असून, त्यामुळे सोन्याच्या किमती आणखी वाढू शकतात. LIC Policy : दररोज केवळ 73 रुपये गुंतवणूक करुन मिळवा 10 लाख रुपये, काय आहे योजना? या कारणांमुळे भाव वाढतील IIFL सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता म्हणतात की, सोन्यासाठी अमेरिकेची किरकोळ विक्री आणि चलनवाढीची आकडेवारी महत्त्वाची ठरेल. याशिवाय चीनमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. कोरोनाचा प्रसार आणि शांघाईमध्ये लागू करण्यात आलेला लॉकडाऊन ही जागतिक अर्थव्यवस्थेसाठी चांगली बातमी असू शकत नाही कारण चीन ही जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. त्यामुळेच भारतात लग्नसराईचा हंगाम सुरू झाल्याने सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Gold and silver prices today, Gold prices today

    पुढील बातम्या