मराठी बातम्या /बातम्या /मनी /

LIC Policy : दररोज केवळ 73 रुपये गुंतवणूक करुन मिळवा 10 लाख रुपये, काय आहे योजना?

LIC Policy : दररोज केवळ 73 रुपये गुंतवणूक करुन मिळवा 10 लाख रुपये, काय आहे योजना?

LIC Jeevan Anand Policy: एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये तुम्हाला आयकर सवलतीचा लाभही मिळतो. यामध्ये आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर लाभ मिळतो. मुदतपूर्ती किंवा मृत्यूच्या वेळी मिळालेल्या रकमेवर कोणताही कर भरावा लागणार नाही.

    मुंबई, 10 एप्रिल : LIC मध्ये गुंतवणूक (Investment Scheme) करण्याचा विचार असेल तर एका चांगल्या पॉलिसीबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. यामध्ये 73 रुपये जमा केल्यास तुम्हाला पूर्ण 10 लाख रुपये मिळतील. या पॉलिसीमध्‍ये तुम्‍हाला मॅच्युरिटीवर पूर्ण 10 लाख रुपये मिळतील. जीवन विम्याच्या या पॉलिसीचे नाव नवीन जीवन आनंद पॉलिसी (LIC Jeevan Anand Policy) आहे. ज्यामध्ये तुम्हाला मॅच्युरिटीवर पूर्ण 10 लाख रुपये मिळतात. याशिवाय तुम्हाला लाइफटाइम डेथचे कव्हरही मिळते. 10 लाख रुपयांचे कॉर्पस करण्यासाठी, तुम्हाला दररोज त्यात 73 रुपये गुंतवावे लागतील. जीवन आनंद पॉलिसीचे वैशिष्ट्ये या पॉलिसीमध्ये गुंतवणक करण्यासाठी तुमचे वय किमान 18 वर्षे असावे.50 वर्षांपर्यंतचे लोक या पॉलिसीमध्ये अर्ज करू शकतात. यात जास्तीत जास्त मॅच्युरिटी वय 75 वर्षे आहे. पॉलिसीची किमान मुदत 15 वर्षे आहे तर पॉलिसीची कमाल मुदत 35 वर्षे आहे. यात तुम्ही वार्षिक, सहामाही, त्रैमासिक आणि मासिक आधारावर प्रीमियम भरू शकता. विमा रकमेची कमाल मर्यादा नाही. किमान मूळ विमा रक्कम एक लाख रुपये आहे. Personal Loan की Gold Loan तुमच्यासाठी कोणतं फायदेशीर? दोघांमधील फरक समजून घ्या कर बचतीचा फायदा  एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये तुम्हाला आयकर सवलतीचा लाभही (Tax Saving Beneifits) मिळतो. यामध्ये आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर लाभ मिळतो. मुदतपूर्ती किंवा मृत्यूच्या वेळी मिळालेल्या रकमेवर कोणताही कर भरावा लागणार नाही. 10 लाख रुपये कसे मिळवायचे? जर तुम्ही ही पॉलिसी 24 वर्षे वयाच्या 5 लाख रुपयांच्या विम्याच्या रकमेसह खरेदी केली तर तुम्हाला वार्षिक सुमारे 26815 रुपये जमा करावे लागतील. जर आपण एका दिवसाच्या आधारावर पाहिले तर ते दररोज सुमारे 73.50 रुपये असेल. समजा तुम्ही 21 वर्षांसाठी पॉलिसी घेतली असेल, तर तुमची एकूण गुंतवणूक सुमारे 5.63 लाख असेल, ज्यामध्ये तुम्हाला मॅच्युरिटीच्या वेळी बोनससह 10 लाख रुपयांहून अधिक मिळतील. इन्फोसिसच्या नारायण मूर्तींची मुलगी अक्षता ब्रिटनच्या राणीपेक्षाही श्रीमंत! कसे ते जाणून घ्या? कर्जाचा लाभ घेता येईल याशिवाय तुम्ही या पॉलिसीवर कर्जही घेऊ शकता. आम्ही तुम्हाला सांगतो की जर तुम्ही प्रीमियम कालावधीत कर्ज घेतले असेल, तर कमाल क्रेडिट सरेंडर वॅल्यूच्या 90 टक्के पर्यंत असेल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, LIC, Money

    पुढील बातम्या