नवी दिल्ली, 05 डिसेंबर: यावर्षी 2020 मध्ये जगाने नवनवीन काही गोष्टी शिकल्या, काही सवयी बदलल्या, कुटुंबाबरोबर अधिक वेळ घालवला. यामध्ये सर्वाधिक बदलावाची गोष्ट म्हणजे Work From Home. मार्च 2020 मध्ये अनेकांनी कल्पना देखील केली नव्हती की पुढील 6-7 महिने घरातूनच काम करायचं आहे. पण ते शक्य झालं. अनेक कंपन्यांनी अद्यापही वर्क फ्रॉम होम सुरू ठेवलं आहे. तर काहींनी लॉकडाऊन (Lockdown) अनलॉकची (Unlock) ची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ऑफिसेस उघडायला सुरुवात केली आहे. मात्र आता कोरोना काळात (Coronavirus) घरातून काम करणाऱ्यांना घराबाहेर जाऊन काम करावं लागणार ही कल्पनाच रुचेनाशी झाली आहे. विशेषत: भारतीयांनी वर्क फ्रॉमची सवय अंगवळणी पडली आहे. इतकी की त्याकरता ते 10 टक्के पगारावरही पाणी सोडायला तयार आहेत. Zee News ने द मॅव्हरिक्स इंडियाच्या सर्व्हेचा हवाला देत याबाबत वृत्त दिले आहे. या LIC च्या योजनेत करा गुंतवणूक, एकदाच हप्ता भरल्यानंतर दरमहा मिळतील 14000 या सर्व्हेतून समोर आलेल्या माहितीनुसार सर्वाधिक भारतीयांची पसंती घरातून काम करण्याला आहे. हा आकडा थोडाथोडका नसून तब्बल 54 टक्के आहे. याकरता त्यांना पगारकपात झाली तरी चालणार आहे. अनिश्चित काळासाठी घरातून काम करायला मिळेल याकरता पगारात 10% कपात सहन करणाऱ्या भारतीयांचा आकडा 34% आहे. एकूण 720 लोकांबरोबर हा सर्व्हे घेण्यात आला. या लोकांचे असं म्हणणं आहे की घरातून काम केल्याने आउटपुट अधिक चांगलं येतं. वर्क फ्रॉम होममुळे प्रोडक्टिव्हिटी वाढते असं 54% लोकांना वाटतं. यामध्ये कोरोना आधीचा काळ आणि नंतरचा काळ यामधील प्रोडक्टिव्हिटीबाबत देखील भारतीयांची मतं जाणून घेतली गेली. यानुसार या सर्व्हेत असं समोर आलं आहे की, 31 टक्के लोकांना असं वाटतं की पूर्वीपेक्षा घरातून काम सुरु केल्यानंतर 25% प्रोडक्टिव्हिटी वाढली आहे.
पैशांची बचत वर्क फ्रॉम होमचा आणखी एक फायदा म्हणजे होणारी पैशांची बचत. ऑफिसमधून येण्याजाण्याचा बराच खर्च यामुळे वाचत आहे. फलेक्स वर्कस्पेस कंपनीने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार भारतातील 3 पैकी 1 कर्मचारी घरातून काम करून महिन्याला साधारण 3 ते 5 हजारांची बचत करतो आहे. हा सर्व्हे 1000 लोकांमध्ये घेण्यात आला. यानुसारही 74 टक्के लोकांनी WFH हा पसंती दिली आहे.

)







