जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Share Market Update : शेअर बाजारातील अस्थिरतेची कारणे समजून घ्या; गुंतवणूक करणे होईल सोपं

Share Market Update : शेअर बाजारातील अस्थिरतेची कारणे समजून घ्या; गुंतवणूक करणे होईल सोपं

Share Market Update : शेअर बाजारातील अस्थिरतेची कारणे समजून घ्या; गुंतवणूक करणे होईल सोपं

शेअर बाजारात सतत चढउतार सुरु आहे. जागतिक आणि काही देशांतर्गत कारणांमुळे बाजारात अस्थिरता असल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या कारणांबद्दल जाणून घेऊया.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 8 फेब्रुवारी : गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात (Share Market) अनिश्चतेचं वातावरण आहे. बाजारात स्थिरता नाही. या आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजेच सोमवारी एआ सेन्सेक्स 1023 अंकांनी घसरला आणि NSE ही 302.70 अंकांनी घसरला. मंगळवारीही दिवसभर चढ-उतार होता. मंगळवारी देखील दोन्ही बेंचमार्क सेन्सेक्स आणि निफ्टी सुरुवातीच्या व्यवहारात सुमारे 1 टक्क्यांनी घसरले. सुरुवातीच्या घसरणीनंतर पुनरागमन केल्यानंतर बाजार हिरव्या चिन्हात आला आणि नंतर घसरण झाली. सत्राअखेर दोन्ही निर्देशांक 0.3 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. अशाप्रकारे बाजारात सतत चढउतार सुरु आहे. जागतिक आणि काही देशांतर्गत कारणांमुळे बाजारात अस्थिरता असल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या कारणांबद्दल जाणून घेऊया. केंद्रीय बँकांची कडक भूमिका अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदरात केलेले बदल यामुळे गुंतवणूकदार हैराण झाले आहेत. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या यूएस जॉब रिपोर्टवरून असे दिसून आले आहे की नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये 7,09,000 अधिक नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. विश्लेषकांचे म्हणणे आहे की यूएस फेड मार्चमध्ये व्याजदर वाढवण्याच्या तयारीत आहे आणि या जॉब रिपोर्टमुळे यूएस सेंट्रल बँकेवर व्याजदर वाढवण्याचा दबाव आणखी वाढेल. त्याचवेळी बँक ऑफ इंग्लंडने नुकतेच व्याजदर वाढवले ​​आहेत. बँक ऑफ कॅनडा पुढील महिन्यात व्याजदरात वाढ करण्याच्या तयारीत आहे. असे मानले जाते की युरोपियन सेंट्रल बँक यावर्षी कधीही व्याजदर बदलू शकते. आता सगळ्यांचे लक्ष अमेरिकेच्या गुरुवारी येणाऱ्या महागाईच्या आकडेवारीकडे लागले आहे. विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांच्या व्याजदरात बदल किंवा बदल होण्याची शक्यता पाहून गुंतवणूकदार चिंतेत आहेत आणि ते पुन्हा पुन्हा शेअर बाजारात विक्री करत आहेत. FD करण्याआधी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा; तुमची भविष्यातील ध्येय गाठणे सोपं होईल RBI धोरण भारतीय रिझर्व्ह बँकेची (RBI) द्विमासिक धोरण बैठक आजपासून सुरू झाली. ते 10 फेब्रुवारीला निकाल देणार आहेत. RBI रिव्हर्स रेपो दरात वाढ करेल अशी विश्‍लेषकांची अपेक्षा आहे. अनेक विश्लेषकांचा अंदाज आहे की पुढील बैठकीत आरबीआय रिव्हर्स रेपो रेट 20-35 बेस पॉइंट्सने 3.55 - 3.6 टक्क्यांनी वाढवू शकते. या शक्यतांमुळे मोठे गुंतवणूकदार सध्या वेट अँड वॉचच्या स्थितीत आहेत. त्यामुळे बाजाराला गती मिळत नसून अधूनमधून घसरण होत आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ रॉयटर्सच्या अहवालानुसार, अमेरिकेतील थंड हवामान आणि रशिया आणि पाश्चिमात्य देशांमधील वाढता तणाव आणि अमेरिकेतील खराब हवामान यामुळे क्रूडच्या किमती सातत्याने वाढत आहेत. कच्च्या तेलाचा दर 92 डॉलरच्या वर पोहोचला आहे, जो जवळपास सात वर्षांचा उच्चांक आहे. क्रूडच्या दरात यंदा 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. बाजार विश्लेषकांचा असा विश्वास आहे की यावर्षी ते प्रति बॅरल 100 डॉलरपर्यंत जाऊ शकते (Crude Oil Price). क्रूडची वाढ भारतीय अर्थव्यवस्थेसाठी घातक आहे. देशांतर्गत बाजारात क्रूडमुळे इंधनाचे दर वाढले तर महागाई वाढेल. याचा थेट परिणाम सर्वसामन्यांवर होणार आहे. क्रूडच्या वाढत्या किमतींमुळे रिझर्व्ह बँकेवर चलनविषयक धोरणात कठोरतेसाठी दबाव वाढतो. FII आणि DII द्वारे विक्री विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPI) विक्री करत आहेत. FII ने जानेवारीत 4.45 अब्ज डॉलर आणि फेब्रुवारीत 1.17 अब्ज डॉलरची विक्री केली. गेल्या दोन ते तीन सत्रांमध्ये देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार (DII) देखील विक्री करत आहेत. त्यांनी सुमारे 1000 कोटी रुपयांची विक्री केली आहे. बड्या गुंतवणूकदारांच्या अशा विक्रीमुळे बाजार दबावाखाली आहे. सामान्य गुंतवणूकदार देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या बाहेर पडतो आणि त्यांचा बाजारावरील विश्वास डळमळीत होतो. शेअर बाजारात अस्थिरतेदरम्यान ब्रोकरेज फर्मची काही शेअर्सची शिफारस, चेक करा टार्गेट प्राईज डिसेंबर तिमाहीचे एकत्रित निकाल डिसेंबर तिमाही (Q3 Result) निकालांमध्ये संमिश्र कल दिसून आला. डिसेंबर तिमाहीत कोणताही मोठा अपट्रेंड दिसला नाही. ब्रोकरेज फर्म जेफरीज इंडियाने (Jefferies India) आर्थिक वर्ष 2022 साठी 55 टक्के कंपन्यांच्या कमाईत घट दाखवली आहे. बिल्डिंग मटेरियल फर्म्स सुप्रीम आणि फिनोलेक्सच्या व्हॉल्यूममध्ये 15-18 टक्क्यांनी घट झाली. जेफरीज म्हणाले की, सिमेंट, स्टील आणि जेनेरिक फार्मा कंपन्या वाढत्या इनपुट खर्चामुळे दबावाखाली आहेत. तिमाही निकालही बाजारासाठी सकारात्मक नाहीत आणि बाजार स्थिर होण्याऐवजी अस्थिरता वाढली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात