मुंबई, 8 फेब्रुवारी : येत्या काही दिवसांत भारतीय शेअर बाजार कोणत्या दिशेने जाईल, हे सध्यातरी सांगणे थोडे कठीण वाटते. बॉन्ड यील्ड तसेच कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याच्या चिंतेने बाजारात अनेक दिवसांपासून घसरण होत आहे. अशा परिस्थितीत ब्रोकरेज हाऊस जिओजितने काही शेअर्स दिले आहेत, ज्यात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. खाली नमूद केलेली सर्व स्टॉक ब्रोकरेज हाऊसेस जिओजितच्या सल्ल्यावर आधारित आहेत. शेअर बाजारात भांडवल गमावण्याचा धोका नेहमीच असतो, त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित सल्लागाराचा सल्ला घ्यावा. जिओजित फायनान्शियलने काही मिड कॅप आणि काही लार्ज कॅप शेअर्सची शिफारस केली आहे. ICICI प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनी (ICICI Prudential Life Insurance Company) या स्टॉकला बाय रेटिंग देत, ब्रोकरेज फर्मने यासाठी 657 रुपयांचे टार्गेट दिले आहे. मंगळवारी हा स्टॉक NSE वर 515.9 रुपयांवर बंद झाला. ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की या शेअरमध्ये 25 टक्क्यांची वाढ दिसून येईल. सुप्रीम इंडस्ट्रीज (Supreme Industries) ब्रोकरेज हाऊसने या स्टॉकसाठी टार्गेट 2,360 रुपये दिले आहे. सध्या हा स्टॉक 1,985 रुपयांवर दिसत आहे. ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की या शेअरमध्ये 17 टक्क्यांची वाढ दिसून येईल. एशियन पेंट्स (Asian Paints) या स्टॉकला बाय रेटिंग देत, ब्रोकरेज फर्मने यासाठी 3663 रुपयांचे टार्गेट दिले आहे. सध्या हा शेअर 3216 रुपयांवर दिसत आहे. ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की या शेअरमध्ये 15 टक्क्यांची वाढ दिसून येईल. मॅरिको (Marica) या स्टॉकला बाय रेटिंग देत, ब्रोकरेज फर्मने यासाठी 560 रुपयांचे टार्गेट दिले आहे. सध्या हा स्टॉक 505 रुपयांवर दिसत आहे. ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की या शेअरमध्ये 9 टक्क्यांची वाढ दिसून येईल. कोलगेट-पामोलिव्ह (Colgate-Palmolive) या स्टॉकला बाय रेटिंग देत, ब्रोकरेज फर्मने यासाठी 1,690 रुपयांचे टार्गेट दिले आहे. सध्या हा स्टॉक 1,438 रुपयांवर दिसत आहे. ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की या शेअरमध्ये 17 टक्क्यांची वाढ दिसून येईल. लार्सन अँड टुब्रो (Larsen & Toubro) या स्टॉकला बाय रेटिंग देत, ब्रोकरेज फर्मने यासाठी 2357 रुपयांचे टार्गेट दिले आहे. सध्या हा शेअर 1,875 रुपयांवर दिसत आहे. ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की या शेअरमध्ये 25 टक्क्यांची वाढ दिसून येईल. L&T फायनान्स होल्डिंग्ज (L&T Finance Holdings) या स्टॉकला बाय रेटिंग देत, ब्रोकरेज फर्मने यासाठी 89 रुपयांचे टार्गेट दिले आहे. सध्या हा शेअर 74.30 रुपयांवर दिसत आहे. ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की या शेअरमध्ये 19 टक्क्यांची वाढ दिसून येईल. टेक महिंद्रा (Tech Mahindra) या स्टॉकला बाय रेटिंग देत, ब्रोकरेज फर्मने यासाठी 1,724 रुपयांचे टार्गेट दिले आहे. सध्या हा स्टॉक 1,434.2 रुपयांवर दिसत आहे. ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की या शेअरमध्ये 19 टक्क्यांची वाढ दिसून येईल. झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस (ZEEL) या स्टॉकला बाय रेटिंग देत, ब्रोकरेज फर्मने त्यासाठी 325 रुपयांचे टार्गेट दिले आहे. हा स्टॉक सध्या BSE वर 270.75 रुपयांवर दिसत आहे. ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की या शेअरमध्ये 19 टक्क्यांची वाढ दिसून येईल. बायोकॉन (Biocon) या स्टॉकला बाय रेटिंग देत, ब्रोकरेज फर्मने यासाठी 460 रुपयांचे टार्गेट दिले आहे. सध्या हा शेअर 404.60 रुपयांवर दिसत आहे. ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की या शेअरमध्ये 15 टक्क्यांची वाढ दिसून येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.