Home /News /money /

मोठी बातमी! ऑगस्टपर्यंत नाही सुरू होणार सामान्य रेल्वेसेवा? परिपत्रकातून दिले संकेत

मोठी बातमी! ऑगस्टपर्यंत नाही सुरू होणार सामान्य रेल्वेसेवा? परिपत्रकातून दिले संकेत

कोरोना व्हायरसच्या संक्रमण रोखण्यासाठी देशामध्ये अजूनही काही ठिकाणी बंद पाळण्यात येत आहे. दरम्यान या कालावधीमध्ये ट्रेनसेवा कधी सुरू होणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. मात्र रेल्वेसेवा लवकर सुरू होण्याची शक्यता कमी आहे.

    नवी दिल्ली, 24 जून : कोरोना व्हायरसच्या संक्रमण रोखण्यासाठी देशामध्ये अजूनही काही ठिकाणी बंद पाळण्यात येत आहे. दरम्यान या कालावधीमध्ये ट्रेनसेवा कधी सुरू होणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. कोव्हिड-19 मुळे जवळपास 3 महिन्यांपासून रेल्वेची सामान्य सेवा बंद आहे. ते पुन्हा नेहमीप्रमाणे सुरू होण्याची शक्यता कमी आहे. कारण रेल्वेने 14 एप्रिल रोजी आणि त्याआधी करण्यात आलेल्या सर्व रेग्यूलर वेळापत्रकानुसार धावण्यात येणाऱ्या गाड्यांचे बुकिंग रद्द केले आहे. या बुकिंगचा पूर्ण रिफंड प्रवाशांना देण्यात येणार आहे. रेल्वेचे याबाबत मत स्पष्ट आहे की, सामान्य प्रवासी रेल्वे सुरु होण्यासाठी अजून बराच कालावधी जाईल. का होणार उशीर? टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार रेल्वेने सोमवारी सर्व झोनसाठी एक परिपत्रक जारी करून असे सांगितले आहे की, 14 एप्रिल रोजी किंवा त्याआधी बुक करण्यात आलेल्या सर्व गाड्यांचे बुकिंग रद्द करण्यात यावे आणि पूर्ण रिफंड जनरेट करण्यात यावा. त्यामुळे ही शक्यता दाट आहे की, सामान्य रेल्वेसेवा सुरू होण्यास खूप काळ जाईल. साधारण ऑगस्ट मध्यापर्यंत या सेवा सुरू होणार नाहीत. सोमवारी जारी करण्यात आले आदेश IRCTC नुसार भारतीय रेल्वेकडून सिस्टिमध्ये ट्रेनचे तिकीट रद्द झाल्यानंतर ऑटोमेटिक फुल रिफंड सुरू करण्यात येईल. या दरम्यान भारतीय रेल्वे तात्कालिक प्रवासासाठी 230 IRCTC स्पेशल ट्रेन्सना विशिष्ट मार्गांवर चालू ठेवेल. कोरोना व्हायरसचे संक्रमण लक्षात घेता, भारतीय रेल्वेने 15 एप्रिलपासून नियमित ट्रेनचे आगाऊ आरक्षण रद्द केले होते. 25 मार्चपासून देशातील रेल्वेसेवा बंद आहे. (हे वाचा-मुकेश अंबानी यांच्या पगारात 12 वर्षांत एकदाही झाली नाही वाढ, वाचा किती आहे सॅलरी) दरम्यान 12 मे पासून रेल्वेने लॉकडाऊनमध्ये विविध राज्यांमध्ये अडकलेल्या नागरिकांना घरी पोहोचवण्यासाठी IRCTC ने स्पेशल रेल्वेसेवा सुरू केली होती. संपादन - जान्हवी भाटकर
    First published:

    Tags: Indian railway

    पुढील बातम्या