Home /News /money /

रेल्वे प्रवाशांसाठी विशेष सूचना! भारतीय रेल्वेने आजही रद्द केल्या आणखी काही गाड्या

रेल्वे प्रवाशांसाठी विशेष सूचना! भारतीय रेल्वेने आजही रद्द केल्या आणखी काही गाड्या

Indian Railways Today Cancelled Train: शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने (Indian Railway) आज शनिवारी काही ट्रेन्स रद्द केल्या आहेत. तर काही गाड्यांचा मार्ग बदलला आहे.

    नवी दिल्ली, 05 डिसेंबर: शेतकरी आंदोलन (Farmers Protest) गेल्या काही दिवसांपासून सुरू असल्यामुळे भारतीय रेल्वेने (Indian Railway) काही गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आजही काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. तुम्ही देखील यापैकी एखाद्या ट्रेनमधून प्रवास करण्याची योजना आखली असेल तर ही बातमी  तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. प्रवासाला सुरुवात करण्याआधी तुमच्या ट्रेनचे स्टेटस अवश्य तपासा. शेतकरी नेते आणि सरकार यांच्यामध्ये बैठका होत असल्या तरी यातून अद्याप कोणताच निर्णय घेण्यात आला नाही आहे. आंदोलन अजूनही जारीच आहे. कोणत्या गाड्या झाल्या रद्द? -ट्रेन क्रमांक 09611: Ajmer–Amritsar express स्पेशल ट्रेन आज 5 डिसेंबर 2020 रोजी रद्द असेल याशिवाय हिच रिटर्न असणारी ट्रेन क्रमांक 09614: Ajmer–Amritsar express स्पेशल ट्रेन उद्या 6 डिसेंबर 2020 रोजी रद्द असेल. -ट्रेन क्रमांक 02715: Nanded–Amritsar express 5 डिसेंबर 2020 रोजी दिल्लीमध्ये थांबवली जाईल. यामुळे ट्रेन क्रमांक 02716: अमृतसर-नांदेड एक्सप्रेस 7 डिसेंबर 2020 रोजी दिल्लीहून सुटेल.  नवी दिल्ली-अमृतसर-नवी दिल्ली दरम्यान अंशत: गाड्या रद्द आहेत. (हे वाचा-या कर्मचाऱ्यांना मे 2021पर्यंत Work From Home, कोरोना झाल्यास 28 दिवस Paid Leave) -ट्रेन क्रमांक 02925: Bandra Terminus-Amritsar exp आज 5 डिसेंबर 2020 रोजी चंदीगडमध्ये स्थगित केली जाईल. ज्यामुळे ट्रेन क्रमांक  02926: अमृतसर-वांद्रे टर्मिनस एक्सप्रेस 7 तारखेला चंदीगडवरूनच वांद्रे याठिकाणी परत येईल. चंदीगड-अमृतसर-चंदीगड ही वाहतूक अंशत: बंद आहे. -ट्रेन क्रमांक 02357: Kolkata-Amritsar express special train ही गाडी आज अंबालामध्ये थांबवली जाईल. यामुळे ट्रेन क्रमांक 02358: अमृतसर-कोलकाता एक्सप्रेस स्पेशल ट्रेन 7 डिसेंबर रोजी अंबाला इथूनच परतेल. अंबाला आणि अमृतसर दरम्यान वाहतूक अंशत: बंद आहे. (हे वाचा-Transaction फेल होऊनही खात्यातून पैसे गेल्यास करा हे काम, बँक दररोज देईल भरपाई) -ट्रेन नंबर 02025: Nagpur-Amritsar express special train ही गाडी 05 डिसेंबर 2020 रोजी नवी दिल्लीमध्ये थांबवली जाईल. परिणामी ट्रेन नंबर 02026: अमृतसर-नागपूर एक्सप्रेस स्पेशल ट्रेन 7 डिसेंबर 2020 रोजी नवी दिल्ली वरूनच परतेल. नवी दिल्ली ते  अमृतसर दरम्यान वाहतूक अंशत: बंद करण्यात आली आहे. शेतकरी आंदोलनामुळे अनेक गाड्या रद्द शेतकऱ्यांमध्ये 'फार्मर बिल' विरोधात असंतोष पाहायला मिळत आहे. परिणामी शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. 23 नोव्हेंबर रोजी हे आंदोलन संपणार होते, पण अद्यापही ते सुरुच आहे. यामुळे रेल्वे प्रवासावर विशेष परिणाम होत आहे. अनेक गाड्या आतापर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Coronavirus, Indian railway

    पुढील बातम्या