नवी दिल्ली, 05 डिसेंबर: येणाऱ्या काळात कोरोनाचे संकट (Coronavirus) कमी होण्याची अपेक्षा जरी केली जात असली, तरीही अद्याप सर्वकाही सुरळीत झाले नाही आहे. अनेक कर्मचारी ऑफिसमध्ये जाण्यास सुरुवात झाली आहे मात्र काही कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम सुरुच ठेवले आहे. प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट (Flipkart) ने देखील त्यांच्या 12000 कर्मचाऱ्यांसाठी घरातून काम करण्याची सुविधा (Work From Home) आणखी काही काळासाठी वाढवली आहे. आता हे कर्मचारी मे 2021 पर्यंत घरातूनच काम करतील. वॉलमार्ट (Walmart) चा मालकी हक्क असणाऱ्या या कंपनीने सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता हा निर्णय घेतला आहे. फ्लिपकार्टने त्यांना 'बँक टू ऑफिस प्लॅन' चा दुसरा टप्पा पुढील वर्षी मे पर्यंत थांबवला आहे. काही दिवसांपूर्व Amazon ने देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी WFH चा कालावधी जून 2021 पर्यंत वाढवला होता.
फ्लिपकार्टच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही पूर्णपणे काम करताना, सहकार्य करताना आणि आशावादी राहण्यासाठी नवीन पद्धतींचा अवलंब करताना या काळात कोरोनाशी लढण्यासाठी खूप फ्लेक्झिबिलीटी दाखवली आहे. कर्मचाऱ्यांच्या सकारत्मकतेसाठी लीडरशीप टीमला खूप अभिमान वाटत आहे.
(हे वाचा-Work From Home भारतीयांच्या सवयीचं होतंय! 10% पगारावर पाणी सोडायलाही तयार)
बिझनेस स्टँडर्डच्या एका अहवालानुसार फ्लिपकार्टने त्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलावणे चालू ठेवले आहे, ज्यांना रोस्टर बेसिसवर आधीपासूनच ऑफिसमधून काम करावे लागत आहे. अन्य सर्व कर्मचारी घरातून काम करतील. कंपनीने ऑफिसमध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांना गाइडलाइन आणि प्रोटोकॉलचं पालन करावं लागेल असंही म्हटलं आहे.
(हे वाचा-SBI ने जारी केला महत्त्वाचा अलर्ट! सर्च करून बँक साइटवर जात असाल तर...)
फ्लिपकार्टचे चीफ पीपल्स ऑफिसर कृष्णा राघवन यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या एका मेलमध्ये असं म्हटलं आहे की, आम्ही लवकरात लवकर एकमेकांना भेटू इच्छित आहोत. मात्र सध्याची परिस्थिती पाहता येणाऱ्या काळात याची आशा दिसत नाही आहे. सोशल डिस्टंसिंग आणि अन्य नियमांचे पालन करणं हे स्वत:ला आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य राहिल.
कोव्हिड लीव्ह पॉलिसी
वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन देण्याव्यतिरिक्त फ्लिपकार्टने 'Covid Care Leaves' ची देखील घोषणा केली आहे. जर एखादा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला तर या योजनेअंतर्गत त्याला 28 दिवसांची सुट्टी देखील मिळेल. या सुट्टीचे पैसे देखील कापले जाणार नाही, पेड लीव्ह स्वरुपात ही सुट्टी दिली जाईल.