Gold Rates Today : सोन्याच्या किंमतींमध्ये आली तेजी,आजपासून हा नवा नियम

Gold Rates Today : सोन्याच्या किंमतींमध्ये आली तेजी,आजपासून हा नवा नियम

जागतिक बाजारपेठेत जोरदार खरेदी झाल्यामुळे बुधवारी सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे भाव 256 रुपयांनी वाढले.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 जानेवारी : जागतिक बाजारपेठेत जोरदार खरेदी झाल्यामुळे बुधवारी सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे भाव 256 रुपयांनी वाढले. सोन्याप्रमाणेच चांदीही 228 रुपयांनी महाग झाली आहे. HDFC सिक्युरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, अमेरिका आणि चीन यांच्यातला व्यापारविषयक करार पाहता सोन्या-चांदीच्या किंमती वाढल्या आहेत.

सोन्याचे नवे दर

सोन्याचे दर वाढून ते 40 हजार 441 रुपये प्रतितोळा झालेत. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोनं आणि चांदीच्या किंमतींमध्ये तेजी आली. सोन्याची किंमत 1 हजार 552 डॉलर प्रतिऔंस आणि चांदीच्या किंमती 17.83 डॉलर प्रति औंस झाल्या.

चांदीचे नवे दर

सोन्याप्रमाणेच चांदीच्या किंमतींमध्येही वाढ झाली. चांदीची किंमत 47 हजार 272 रुपये किलो झाली.

सोन्याबद्दल नवा नियम

आजपासून सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग सक्तीचं करण्यात येणार आहे. यासाठी सराफा व्यावसायिकांना आपली नोंदणी करावी लागेल. तुम्ही घेतलेल्या दागिन्यामध्ये सोन्याचं प्रमाण किती आहे हे हॉलमार्किंगवरून कळतं. नव्या नियमांनुसार सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग सक्तीचं असेल. यासाठी सराफांना लायसन्सची आवश्यकता आहे.

(हेही वाचा : जगातला हा सर्वात श्रीमंत माणूस भारतात गुंतवणार 7 हजार कोटी रुपये)

सोन्याचं हॉलमार्किंग करण्यासाठी देशभरात 400 ते 500 नवी केंद्रं उघडण्यात येणार आहेत. सध्या देशात अशी 700 केंद्र आहेत. सोन्याच्या हॉलमार्किंगसाठी ग्रामीण क्षेत्रात सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.

काय असतं हॉलमार्किंग?

हॉलमार्किंगच्या प्रक्रियेत सोन्याच्या दागिन्यात शुद्ध सोनं किती आणि इतर धातूंचं प्रमाण किती हे तपासलं जातं. सोन्याच्या शुद्धतेबद्दल अधिकृत प्रमाणपत्र देणं म्हणूनच आता सक्तीचं करण्यात आलं आहे. यासाठी ज्वेलर्सना परवानेही घ्यावे लागतील.

=============================================================================================

Published by: Arti Kulkarni
First published: January 15, 2020, 5:41 PM IST
Tags: goldsilver

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading