मराठी बातम्या /बातम्या /मनी /26 February ला भारत बंद; व्यापारांच्या संपामुळे देशभरातले बाजार राहणार बंद

26 February ला भारत बंद; व्यापारांच्या संपामुळे देशभरातले बाजार राहणार बंद

देशातल्या व्यापारी संघटनांनी शुक्रवारी (26 February 2021) देशव्यापी बंद (Bharat Bandh 2021) पुकारला आहे. देशातले 8 कोटी व्यापारी हरताळ पाळणार आहेत. याचा तुमच्यावर काय परिणाम होणार वाचा..

देशातल्या व्यापारी संघटनांनी शुक्रवारी (26 February 2021) देशव्यापी बंद (Bharat Bandh 2021) पुकारला आहे. देशातले 8 कोटी व्यापारी हरताळ पाळणार आहेत. याचा तुमच्यावर काय परिणाम होणार वाचा..

देशातल्या व्यापारी संघटनांनी शुक्रवारी (26 February 2021) देशव्यापी बंद (Bharat Bandh 2021) पुकारला आहे. देशातले 8 कोटी व्यापारी हरताळ पाळणार आहेत. याचा तुमच्यावर काय परिणाम होणार वाचा..

  नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी : देशातल्या व्यापारी संघटनांनी शुक्रवारी (26 February 2021) देशव्यापी बंद (Bharat Bandh 2021) पुकारला आहे. या संपाला वाहतूक संघटना, छोटे दुकानदार आदींनी आधीच पाठिंबा दर्शवल्यामुळे उद्या दिवसभर बाजार व्यवहार ठप्प (markets will remain closed). राहण्याची चिन्हं आहेत. वस्तू आणि सेवा कराच्या (Goods and Services Tax) म्हणजे GST च्या रचनेत फेरबदल करण्याच्या मागणीला जोर येण्यासाठी हा देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे.

  कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ही व्यापाऱ्यांची संघटना. वस्तू आणि सेवा कराच्या (GST) तरतुदींचीमध्ये फेरबदल करण्याच्या मागणीला लावून धरत या संघटनेनं 26 फेब्रुवारीला भारत बंदचं (Bharat Band) आवाहन केलं आहे. यादिवशी देशभरातील सर्व व्यावसायिक बाजार बंद राहतील.

  CAIT चा दावा आहे, की यादिवशी 8 कोटीहून अधिक व्यापारी संपावर असतील. कॅटच्या नेतृत्वात येत्या 26 फेब्रुवारीला GST मधील कथित निरर्थक आणि अतार्किक तरतुदींना (unfair provisions in GST) परत घेण्यासह अमेझॉन या इ-कॉमर्स (E-commerce company Amazon) कंपनीवर निर्बंध आणण्याची मागणी केली आहे.

  देशाच्या दळणवळण क्षेत्रातील सर्वात मोठी संघटना ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट वेलफेअर असोसिएशननं आधीच कॅटच्या या व्यापारी बंदला समर्थन दिलं आहे. सोबतच यादिवशी दिवसभर चक्का जाम करण्याचीही घोषणा या संघटनेनं केली आहे. याशिवाय मोठ्या संख्येनं अनेक राष्ट्रीय व्यापारी संघटनाही (various National traders associations) या व्यापारी बंदच्या समर्थनात समोर आल्या आहेत.

  यात विशेषकरून ऑल इंडिया एफएमजीसी डिस्ट्रिब्युटर्स फेडरेशन, फेडरेशन ऑफ ऍल्युमिनियम युटेन्सिल्स मॅन्युफॅक्चरर्स अँड ट्रेडर्स असोसिएशन, नॉर्थ इंडिया स्पायसेस ट्रेडर्स असोसिएशन, ओळ इंडिया कम्प्युटर डीलर्स असोसिएशन, ओळ इंडिया कॉस्मॅटिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन इत्यादी संघटना आहेत.

  हे वाचा -  पगारवाढ मिळून सुध्दा हातात कमीच पडणार रक्कम; जाणून घ्या काय आहेत कारणं

  कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी सी भरतिया आणि राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितलं, की जीएसटीमधील अनेक अन्याय्य आणि अयोग्य तरतुदी आम्ही नाकारतो. यात माल विकणाऱ्या व्यापाऱ्यांना खूप तोटा सोसावा लागतो. हे तर मुघलांच्या आणि इंग्रजांच्या काळातही नव्हतं. कॅटचे महामंत्री प्रवीण खंडेलवाल आणि भरतिया यांनी असा आरोप केला, की जीएसटी कॉन्सिलनं आपल्या फायद्यासाठी जीएसटीचं स्वरूप बिघडवलं आहे.

  हेही वाचा टोलनाक्यावर Fastag स्कॅन झाला नाही? दंड देऊ नका, काय आहे तुमचा हक्क?

  ते हेसुद्धा म्हणाले, की जीएसटी एक पूर्णतः अपयशी कर व्यवस्था (Failed tax system) असल्याचंही ते म्हणाले. जीएसटीच्या मूळ स्वरुपासोबत खेळ केला गेला आहे. दरम्यान CAIT नं 21 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र पाठवून या प्रकरणात लक्ष घालण्याचा आग्रह केला आहे.

  व्यापाऱ्यांच्या या संपाचा सर्वसामान्यांवर थेट परिणाम होणार नसला तरी त्या दिवशी सगळे घाऊक बाजार बंद राहतील. त्यामुळे माल वाहतूक विस्कळीत होऊ शकते. पुरवठ्यात अडचणी येऊ शकतात आणि त्यामुळे त्या दिवशी बाजारपेठांमध्ये शुकशुकाट असायची शक्यता आहे.

  First published:
  top videos

   Tags: Bharat bandh 2021, Business News, GST, India, Money