Home /News /money /

Petrol Price Today: मुंबईकरांना आजही पेट्रोलसाठी मोजावी लागणार मोठी किंमत, वाचा आजचा भाव

Petrol Price Today: मुंबईकरांना आजही पेट्रोलसाठी मोजावी लागणार मोठी किंमत, वाचा आजचा भाव

Petrol Diesel Price Today 29th Dec 2021: आजही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र असं असलं तरीही हे दर मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर आहेत. इंधनाचा भाव कधी कमी होणार याच प्रतीक्षेत सामान्य आहेत.

    मुंबई, 29 डिसेंबर: आजही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर (Petrol Diesel Price Today 29th Dec 2021) आहेत. मात्र असं असलं तरीही हे दर मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर आहेत. इंधनाचा भाव कधी कमी होणार याच प्रतीक्षेत सामान्य आहेत. आज मुंबईत पेट्रोलचा भाव 109.98 रुपये तर डिझेलचा भाव 94.14 रुपये प्रति लीटर आहे. महाराष्ट्रातील इतर शहरातही इंधनाचे दर स्थिर आहेत, त्यात कोणताही बदल झालेला नाही. लवकर स्वस्त होणार पेट्रोल-डिझेल पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी सरकार नवीन प्लॅन तयार करत आहे. भारत कच्च्या तेलाच्या किमती कमी करण्यासाठी अन्य प्रमुख अर्थव्यवस्थांसह समन्वयाने भारत धोरणात्मक तेल साठ्यातून तेल काढण्याच्या योजनेवर काम करत आहे. दररोज सकाळी 6 वाजता बदलते किंमत दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. राज्यात काय आहेत पेट्रोल-डिझलचे दर?
    शहर पेट्रोलचा भाव (प्रति लीटर) डिझेलचा भाव (प्रति लीटर)
    पुणे 110.19 रुपये 92.95 रुपये
    मुंबई 109.98 रुपये 94.14 रुपये
    नाशिक 109.86 रुपये 92.64 रुपये
    नागपूर 109.74 रुपये 92.55 रुपये
    अहमदनगर 110.80 रुपये 93.55 रुपये
    औरंगाबाद 110.66 रुपये 93.41 रुपये
    रत्नागिरी 112.20 रुपये 94.92 रुपये
    परभणी 112.35 रुपये 95.03 रुपये
    पालघर 109.63 रुपये 92.39 रुपये
    सांगली 109.65 रुपये 92.47 रुपये
    कोल्हापूर 109.69 रुपये 92.50 रुपये
    अशाप्रकारे घरबसल्या तपासा पेट्रोल-डिझेलचे नवे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. इंडियन ऑइलचे कस्टमर 92249 92249 वर SMS पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. एचपीसीएल कस्टमर HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घेऊ शकतात.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol price

    पुढील बातम्या