मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Success Story: कधीकाळी होतं फक्त एक दुकान आता 400 कोटींची होते उलाढाल; वाचा Ferns N Petals ची यशोगाथा

Success Story: कधीकाळी होतं फक्त एक दुकान आता 400 कोटींची होते उलाढाल; वाचा Ferns N Petals ची यशोगाथा

जाणून घ्या Ferns N Petals ची यशोगाथा

जाणून घ्या Ferns N Petals ची यशोगाथा

या दुकानाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला. मग विकास गुटगुटिया यांनी दिल्लीतच इतर अनेक भागांत व्यवसाय वाढवला.

    मुंबई, 10 जानेवारी:  समजा, तुमचा वाढदिवस आहे आणि सकाळी तुमच्या दारासमोर सुंदर पुष्पगुच्छ आणि केकचा बॉक्स घेऊन एखादा कुरियर बॉय उभा असेल तर? बसेल ना आश्चर्याचा धक्का ? तुम्हाला हा आश्चर्याचा हा धक्का प्रचंड आनंद देऊन जाईल. तुम्हाला हा आनंद देण्याच्या तुमच्या जवळच्या व्यक्तीची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मदतीला आलेली असेल फर्न्स एन पेटल्स (Ferns N Petals) ही कंपनी. सुंदर, कलात्मक पुष्पगुच्छ आणि छानशी भेटवस्तू आपल्या आवडत्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे ती फर्न्स एन पेटल्सनं (Ferns N Petals Company). ही अनोखी स्वप्नवत कल्पना व्यवसाय म्हणून प्रत्यक्षात (Success Story) उतरवली आणि इतकंच नव्हे, तर अत्यंत यशस्वी करून दाखवली ती विकास गुटगुटिया यांनी. तब्बल 27 वर्षांच्या प्रदीर्घ वाटचालीनंतर आज त्यांची ही कंपनी या क्षेत्रातील एक विश्वासार्ह ब्रँड म्हणून ओळखली जाते. आज फर्न्स एन पेटल्स (Ferns N Petals) जगातली सर्वांत मोठी फ्लॉवर रिटेलर कंपनी असून, देशातली सर्वांत मोठी फ्लॉवर अँड गिफ्ट रिटेलर कंपनी (Flower And Gift Retailer Company) आहे. देशातल्या 120 शहरांमध्ये कंपनीची 320 पेक्षा जास्त आउटलेट्स असून, या कंपनीची उलाढाल 400 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. जाणून घेऊ या फर्न्स एन पेटल्सची ही यशस्वी वाटचाल. 'टीव्ही 9 हिंदी'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

    विकास गुटगुटिया (Vikas Gutgutiya) यांच्या फर्न्स एन पेटल्सचा प्रवास 1994मध्ये दिल्लीतल्या (Delhi) फुलांच्या एका दुकानातून सुरू झाला; पण त्याचं बीज त्यांच्या मनात रुजलं होतं ते कोलकात्यात. (Kolkata) सुमारे 25 वर्षांपूर्वी कोलकाता इथं शिकत असताना विकास गुटगुटिया त्यांच्या एका नातेवाईकाला फुलांच्या व्यवसायात मदत करत असत. त्यामुळे त्यांना विविध प्रकारच्या फुलांची माहिती झाली. अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यातूनच त्यांनी फुलांच्या व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. दिल्लीत आल्यानंतर 1994 मध्ये फर्न्स एन पेटल्स नावानं आपलं पहिलं दुकान त्यांनी दिल्लीच्या एका भागात सुरू केलं. त्या काळी फूलविक्रेते रस्त्याच्या कडेला बसून फुलं विकत; मात्र फुलांचं दुकान ही संकल्पना तशी नवीनच होती. त्यामुळेच फर्न्स एन पेटल्सची वेगळी ओळख निर्माण झाली. हळूहळू या दुकानाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला. मग विकास गुटगुटिया यांनी दिल्लीतच इतर अनेक भागांत व्यवसाय वाढवला.

    MPSC Group C Exam: उमेदवारांनो, परीक्षेसाठी अर्ज केलात ना? उद्याची शेवटची तारीख

    व्यवसाय वाढवत असताना त्यांना एक कठीण समस्या जाणवू लागली ती म्हणजे फुलांची देखभाल करण्याची. कारण फुलं ही नाशिवंत वस्तू आहे. अशा वेळी वेगवेगळ्या वातावरणातल्या ग्राहकांपर्यंत ताजी फुलं पोहोचवणं हे मोठं आव्हान होतं; मात्र नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून, पुरवठा आणि वाहतूक साखळी मजबूत आणि गतिमान करून त्यांनी ताजी फुलं लोकांपर्यंत पोहोचवण्यात यश मिळवलं. हळूहळू ग्राहकांची बदलती जीवनशैली, बदलत्या गरजा यांचा वेध घेऊन त्यांनी फुलांबरोबर भेटवस्तू, केक देण्याची सुविधाही उपलब्ध केली. या संकल्पनेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्यांनी लग्नसमारंभ, इतर मोठे कार्यक्रम अशा ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची फुलं, पुष्पगुच्छ, फुलांची सजावट अशी कामं करण्यासही सुरुवात केली. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला आणि फर्न्स एन पेटल्सचं नाव सगळीकडे गाजू लागलं. देशभरातल्या त्यांच्या दुकानांची संख्या वाढू लागली.

    तब्बल 27 वर्षांच्या प्रदीर्घ मेहनतीनंतर आज फर्न्स एन पेटल्स हा आज प्रसिद्ध भारतीय ब्रँड (Indian Brand) बनला असून, वेगवेगळ्या 11 क्षेत्रांत त्यांनी आपला व्यवसाय विस्तारला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही यूएई आणि सिंगापूरमध्ये या ब्रँडनं आपला ठसा उमटवला आहे. आता फर्न्स एन पेटल्सची देशातल्या विविध 120 शहरांत 320 दालनं असून, 2021 मध्ये कंपनीनं 400 कोटींची उलाढाल (400 Crores Turnover) केली आहे.

    आता कंपनी मार्केटिंगसाठी नवनव्या कल्पना वापरत असून, सोशल मीडियाचाही प्रभावी वापर करत आहे. ई-कॉमर्स क्षेत्रातही कंपनीनं प्रवेश केला आहे. एफएनपी वेडिंग्ज अँड इव्हेंट्सच्या नावाखाली लग्न आणि अन्य कार्यक्रम व्यवस्थापन उद्योगातही बस्तान बसवलं आहे. देशातल्या फूल व्यवसायात कंपनीचा एक तृतीयांश वाटा असून, परदेशातही व्यवसाय विस्तारासाठी कंपनी प्रयत्न करत आहे. रशिया, ब्रिटनसह अनेक देशांमध्ये व्यवसाय वाढवण्याची कंपनीची योजना आहे.

    आता तुमच्या Dream कंपनीत मिळणार नोकरी; या स्मार्ट पद्धतीनं करा जॉब सर्च

    फुलांच्या एका दुकानापासून आज 400 कोटींची उलाढाल करणारी 320 दालनं असणारी कंपनी अशी बहरत गेलेली विकास गुटगुटिया यांच्या फर्न्स एन पेटल्सची वाटचाल थक्क करणारी आणि प्रेरणादायी आहे.

    First published:

    Tags: Business, Career, Delhi, Startup, Success story