नवी दिल्ली, 10 सप्टेंबर : केंद्र सरकारने इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) भरण्याची शेवटची तारीख पुन्हा एकदा वाढवली आहे. आता 31 डिसेंबर 2021 पर्यंत आर्थिक वर्ष 2020-21 साठी इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) जमा करता येईल. या वर्षात सरकारने दोन वेळा इन्कम टॅक्स फाइल करण्याची मुदत वाढवली आहे. कोरोनामुळे पहिल्यांदा तारीख वाढवण्यात आली होती. परंतु आता टेक्निकल एररमुळे एका वर्षात दुसऱ्यांदा मुदत वाढवण्यात आली आहे.
इन्कम टॅक्सच्या नव्या पोर्टलमध्ये अनेक समस्या येत आहेत. 7 जून रोजी नवी वेबसाईट लाँच झाल्यानंतर पोर्टलमध्ये अद्यापही काही समस्या येत आहेत. इन्कम टॅक्सचं हे नवं पोर्टल इंफोसिसने तयार केलं आहे. पोर्टमध्ये सततच्या तांत्रिक समस्यांबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी इंफोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक यांच्याशीही चर्चा केली होती.
सरकारने 15 सप्टेंबरपर्यंत पोर्टलमध्ये येणाऱ्या समस्या दूर करण्याबाबत सांगितलं होतं. परंतु अद्यापही समस्या येत असल्याने सरकारने इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची तारीख वाढवली आहे. याआधी ITR भरण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 होती. त्याआधी ही तारीख 31 जुलै होती. परंतु आता आणखी मुदत वाढ करत शेवटची तारीख 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
CBDT extends the due date for filing of Income Tax Returns for the assessment year 2021-22 till 31st December pic.twitter.com/7IJc8MTsN7
— ANI (@ANI) September 9, 2021
दरम्यान, कंपन्यांसाठी ITR भरण्याची तारीख 30 नोव्हेंबर 2021 ऐवजी आता 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.