मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Petrol Price Today: सामान्यांना मोठा दिलासा! पुन्हा कमी झाले पेट्रोल-डिझेलचे दर

Petrol Price Today: सामान्यांना मोठा दिलासा! पुन्हा कमी झाले पेट्रोल-डिझेलचे दर

Petrol and Diesel Price Today

Petrol and Diesel Price Today

आज पुन्हा एकदा सामान्यांना पेट्रोल-डिझेलच्या किंमतीबाबत दिलासा मिळाला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर आज (Petrol-Diesel Price today) 15 पैशांनी उतरले आहेत.

    नवी दिल्ली, 24 ऑगस्ट: सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Petrol-Diesel Price today)आज पुन्हा एकदा सामान्यांना दिलासा दिला आहे. एक दिवस दर स्थिर राहिल्यानंतर आज मंगळवारी पेट्रोल-डिझेलचे दर घटले आहेत. रविवारी देखील पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी झाल्या होत्या, मात्र सोमवारी दरात कोणताही बदल झाला नव्हता. आज पेट्रोलचे दर 15 पैशांनी तर डिझेलही 15 पैशांनी स्वस्त झालं आहे. रविवारी दोन्ही इंधनांमध्ये 20 पैसे प्रति लीटरची कपात झाली होती. पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी सहा वाजता रिव्हाइज केले जातात. तुम्ही केवळ एका SMS च्या माध्यमातून तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आज मुंबईमध्ये पेट्रोलचे दर (Petrol Price in Mumbai) 107.52 रुपये आणि डिझेलचे दर (Diesel Price in Mumbai) 96.48 रुपये प्रति लीटर आहेत. हे वाचा-कर्ज फेडलात? पण बँकेकडून घेतलात का 'हे' महत्त्वाचं प्रमाणपत्र? महत्त्वाच्या शहरातील पेट्रोल-डिझलचे भाव >> दिल्ली पेट्रोल 101.49 रुपये आणि डिझेल 88.92 रुपये प्रति लीटर >> मुंबई पेट्रोल 107.52 रुपये आणि डिझेल 96.48 रुपये प्रति लीटर >> चेन्नई पेट्रोल 99.20 रुपये आणि डिझेल 93.52 रुपये प्रति लीटर >> कोलकाता पेट्रोल 101.82 रुपये आणि डिझेल 91.98 रुपये प्रति लीटर >> नोएडा पेट्रोल 98.79 रुपये आणि डिझेल 89.49 रुपये प्रति लीटर >> जयपूर पेट्रोल 108.42 रुपये आणि डिझेल 98.06 रुपये प्रति लीटर >> भोपाळ पेट्रोल 109.91 रुपये आणि डिझेल 97.72 रुपये प्रति लीटर अशाप्रकारे जाणून घ्या इंधनाचे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS) च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. हे वाचा-LIC ची खास पॉलिसी; 916 रुपयांच्या बचतीवर मिळेल 4 लाखांचा रिटर्न तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol and Diesel price cut

    पुढील बातम्या