नोकरदारांसाठी महत्त्वाचं; 'हे' आहेत फाॅर्म 16शी जोडलेले अधिकार

नोकरदारांसाठी महत्त्वाचं; 'हे' आहेत फाॅर्म 16शी जोडलेले अधिकार

Income Tax, Form 16 - नोकरी करणाऱ्यांसाठी फाॅर्म 16 खूपच महत्त्वाचा आहे

  • Share this:

मुंबई, 22 जून : नोकरी करणाऱ्यांसाठी फाॅर्म 16 खूपच महत्त्वाचा आहे. पण याबद्दल कमी लोकांना माहिती असते. ज्या ठिकाणी तुम्ही नोकरी करता तिथून तुम्हाला फाॅर्म 16 मिळतो. हा फाॅर्म रिटर्न भरण्यासाठी उपयोगी असतो. तुमच्या मिळकतीचा हा पुरावा असतो. खरं तर हा फाॅर्म 16 16 जूनपर्यंत मिळतो. पण TDS रिटर्न फाइल करण्याची तारीख वाढवलीय. सध्या 10 जुलैपर्यंत फाॅर्म 16 मिळेल. या फाॅर्मसंबंधी महत्त्वाच्या गोष्टी -

फाॅर्म 16शी जोडलेले तुमचे अधिकार

टॅक्स एक्सपर्ट गौरी चढ्ढा सांगतात, करदात्यांनी फाॅर्म 16मध्ये लिहिलेली सर्व माहिती वाचावी. तुम्हाला तुमची कंपनी फाॅर्म 16 देत नसेल तर दंड होऊ शकतो. सेक्शन 272 प्रमाणे 100 रुपये रोजचा दंड आहे.

फाॅर्म 16 मध्ये काही चूक असेल तर कंपनीला माहिती द्या. ती चूक सुधारली की रिटर्न फाइल करा. फाॅर्म 16मध्ये PART A आणि B Traces वरून डाऊनलोड होईल.

फक्त 1.30 लाखात सुरू करा 'हा' व्यवसाय आणि कमवा 5.5 लाख रुपये

फाॅर्म 16 आणि रिटर्नमध्ये काही फरक नको. फाॅर्म 16 मिळाल्यानंतर पॅन नंबर, पगार आणि कर सवलत तपासून पाहा. सोबत कंपनीचं पॅन, TAN, सही आणि स्टँप तपासून पाहा.

मोदी सरकारची खास योजना, देतात मोफत ट्रेनिंग आणि 8 हजार रुपये

नव्या गुंतवणुकीची माहिती कंपनीला द्या. तुम्ही नवी नोकरी स्वीकारलीत तर तुम्हाला आधीच्या आणि आताच्या दोन्ही मालकाकडून फाॅर्म 16 मिळेल. पण कर बचत दोन वेळा होणार नाही.

मोदी सरकारच्या 'या' योजनेत तुम्ही घरबसल्या मिळवू शकाल पेन्शन

फाॅर्म 16शी जोडलेल्या गोष्टी

काय असतो फाॅर्म 16? - कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी प्रसिद्ध केलेलं सर्टिफिकेट असतं. यात कर्मचाऱ्याच्या पगारातून कापलेला TDS असतो. यावरून हेही कळतं की संस्था TDS कापून सरकारमध्ये जमा करतेय.

फाॅर्म 16 चे दोन भाग असतात - पार्ट ए मध्ये कंपनीचा TAN, कंपनी, कर्मचाऱ्यांचा पत्ता, असेसमेंट इयर, कामाचा अवधी आणि सरकारला जमा केलेला TDS याची माहिती असते.

फाॅर्म 16 मध्ये पार्ट बी - त्यात पगार, डिडक्शन, करयोग्य रक्कम आणि पगारातून कापलेला टॅक्स यांचा समावेश आहे.

कंपनीला फाॅर्म 16 द्यावाच लागतो. नोकरी बदलली तरी कर्मचाऱ्याला फाॅर्म 16 द्यावा लागतो.

फाॅर्म 16 इन्कम टॅक्स रिटर्न भरायला उपयोगी असतो.

VIDEO: 'मुख्यमंत्री भाजपचाच होणार'; कार्यकर्त्यांची भावना!

First published: June 22, 2019, 4:22 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading