मुंबई, 22 जून : मोदी सरकार चालवत असलेल्या पेन्शन योजनेत आता गुंतवणूक करणं सोपं झालंय. टेलिकाॅम कंपनी एअरटेलच्या पेमेंट बँकेनं आपल्या खातेधारकांसाठी सुरुवात केलीय. तुमचं या बँकेत आधीच खातं असेल तर सोपं जाईल. भारत सरकारची अटल पेन्शन योजना अमलात आणणारी ही पहिली बँक आहे. 210 रुपयांत महिन्याला 5 हजार रुपये पेन्शन मोदी सरकारनं माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या नावे अटल पेन्शन योजना सुरू केलीय. देशातल्या 60 वर्षांपेक्षा वयानं मोठ्या असलेल्या व्यक्तींना पेन्शन मिळावं, म्हणून ही योजना सुरू केलीय.तुम्ही त्यासाठी दर महिन्याला 210 रुपये दर महिन्याला जमा करा. निवृत्तीनंतर तुम्हाला दर महिन्याला 5 हजार रुपये मिळू शकतात. तुम्ही 18 वर्षांपासून या योजनेत भाग घेतला तर 60 वर्षानंतर तुम्ही महिन्याला 5 हजार रुपये मिळवता येईल. व्यक्तीचा मृत्यू झाला तर पुढे त्याचा जोडीदार ही योजना सुरू ठेवू शकतो. फक्त 1.30 लाखात सुरू करा ‘हा’ व्यवसाय आणि कमवा 5.5 लाख रुपये 18 ते 40 वर्षांचे लोक यात भाग घेऊ शकतात अटल पेन्शन योजनेत तुम्ही कमीत कमी 20 वर्ष गुंतवणूक करू शकता. 18 ते 40 वर्षापर्यंत लोक त्यात भाग घेऊ शकतात. मोदी सरकारची खास योजना, देतात मोफत ट्रेनिंग आणि 8 हजार रुपये हे आहेत नियम तुम्हाला दर महिन्याला 1 हजार रुपयांचं पेन्शन हवं असेल तर वयाप्रमाणे 42 रुपयांपासून 291 रुपयांपर्यंत दर महिन्याला गुंतवावे लागतील. समजा गुंतवणूकदाराचा मृत्यू झाला तर नाॅमिनीला 1,70,000 रुपये मिळतील. भारतानं टॉस जिंकत घेतला फलंदाजीचा निर्णय तुम्हाला दर महिन्याला 2 हजार रुपयांचं पेन्शन हवं असेल तर दर महिन्याला 84 रुपये ते 582 रुपये भरावे लागतील. या योजने दरम्यान व्यक्ती आणि त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला तर नाॅमिनीला 3,40,000 रुपये मिळतील. दर महिना 5 हजार रुपये पेन्शन हवं असेल तर दर महिन्याला 210 रुपयांपासून ते 1454 रुपयांपर्यंत पैसे भरावे लागतील. आणि योजनेदरम्यान मृत्यू झाला तर नाॅमिनीला 8,50,000 रुपये मिळतील. ही स्कीम समाजातल्या कमकुवत वर्गासाठी आहे. यात गुंतवणूक करण्यासाठी तुमचं बँकेत बचत खातं आणि आधार कार्ड असायला हवं. हे खातं बंद होऊ शकतं यात 6 महिने पैसे भरले नाहीत तर खातं फ्रीज करतील. 12 महिन्यात भरले नाहीत तर ते डिअॅक्टिव्ह करतील आणि 24 महिन्यांनी बंद करतील. त्यामुळे त्यात नियमित पैसे भरले पाहिजेत. रेल्वे कर्मचाऱ्याला WWE स्टाईलने चोपला, VIDEO व्हायरल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







