Home /News /money /

तुम्हाला किती Income Tax द्यावा लागेल? Tax Calculator वापरून काढा कराची रक्कम

तुम्हाला किती Income Tax द्यावा लागेल? Tax Calculator वापरून काढा कराची रक्कम

नव्या टॅक्स स्लॅब रचनेत कर कमी केला आहे. पण यामध्ये करबचतीचा फायदा मिळणार नाही. Budget 2020 नंतर आता तुम्हाला नेमका किती कर बसेल बघा या कॅलक्युलेटरचा वापर करून...

  नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी : केंद्रीय अर्थसंकल्पात (Budget 2020) इनकम टॅक्समध्ये (Income Tax Slab Changes) काही बदल केले आहेत. नेहमीच्या तीन ऐवजी 6 टॅक्स स्लॅब असतील. 5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त करण्यात आलं आहे. अधिक उत्पन्न गटांसाठी कमी टॅक्स लागेल, पण सध्या अस्तित्वात असणाऱ्या करबचतीचा फायदा (Standard Deduction) किंवा कुठलीही सवलत (Tax exemptions) त्यातून मिळणार नाही. नव्या टॅक्स स्लॅबमध्ये करबचतीचा फायदा मिळणार नाही, असा याचा अर्थ. जुन्या स्लॅबप्रमाणे कर भरण्याचा पर्याय अर्थमंत्र्यांनी खुला ठेवला आहे. अशा असतील इनकम टॅक्सचा नव्या स्लॅब 5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त - 5 लाख रु.ते 7.5 लाख उत्पन्न - 10 टक्के इनकम टॅक्स - 7.5 लाख ते 10 लाख रु. उत्पन्न - 15 टक्के इनकम टॅक्स - 10 ते 12.5 लाख रु. उत्पन्न - 20 टक्के इनकम टॅक्स - 12.5 ते 15 लाख रु. उत्पन्न - 25 टक्के इनकम टॅक्स - 15 लाख रु. जास्त उत्पन्न - 30 टक्के तुमच्या उत्पन्नावर नेमका किती कर द्यावा लागेल, हे तपासून पाहण्यासाठी हा tax calculator वापरून पाहा. तुमचं उत्पन्न, तुम्ही भरत असलेलं घरभाडं, तुमची करमुक्त गुंतवणूक याची माहिती भरलीत तर नेमका किती टॅक्स भरावा लागेल, हे या टॅक्स कॅलक्युलेटरच्या मदतीने कळू शकेल. कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात केल्यानंतर पर्सनल इनकम टॅक्समध्ये सवलतीची मागणी जोर धरत होती. अर्थव्यवस्थेमध्ये मागणी आणि पुरवठा वाढवण्यासाठी लोकांची क्रयशक्ती वाढणं गरजेचं होतं. त्यामुळेच ही सवलत देण्यात आली आहे. हेही वाचा IT दिलासा सरसकट नाही; नवीन टॅक्स स्लॅबसाठी सोडाव्या लागणार 70 सवलती

  Budget 2020 : 'बजेट'मधल्या या आहेत 15 महत्त्वाच्या गोष्टी, जाणून घ्या

   Union Budget 2020: बजेटदिवशीच शेअर बाजारात हाहाकार, सेन्सेक्स 987 अंकांनी कोसळला मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सडकून टीका Budget 2020 : वीज मीटर होणार 'प्रीपेड', रिचार्ज केल्यानंतर मिळणार वीज
  Published by:अरुंधती रानडे जोशी
  First published:

  Tags: Budget 2020, Income tax

  पुढील बातम्या