Union Budget 2020: बजेटदिवशीच शेअर बाजारात हाहाकार, सेन्सेक्स 987 अंकांनी कोसळला

Union Budget 2020:  बजेटदिवशीच शेअर बाजारात हाहाकार, सेन्सेक्स 987 अंकांनी कोसळला

गेल्या 10 बजेटमधली ही सर्वात मोठी घसरण ठरलीय हे विशेष. शिवाय बाजार गेल्या तीन महिन्यातल्या निच्चांकी पातळीवर पोहोचलाय.

  • Share this:

नवी दिल्ली, 01 फेब्रुवारी: देशाचा अर्थसंकल्प शनिवारी सादर झाला. देशाची अर्थव्यवस्था एका संकटातून मार्गक्रमण करत असताना सादर झालेला अर्थसंकल्प अनेक अर्थांनी महत्वाचा आहे. अर्थसंकल्पातून सरकारनं अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. करदात्यांना मोठा दिलासा दिला असला तरी शेअर बाजारात मात्र गुंतवणूकदारांचा निरुत्साह दिसला. शेवटच्या काही तासात सेन्सेक्समध्ये 987 अंकांची ऐतिहासिक घसरण झाली.

गेल्या 10 बजेटमधली ही सर्वात मोठी घसरण ठरली आहे. शिवाय बाजार गेल्या तीन महिन्यातल्या निच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. मनमोहन सिंग सरकारनं फेब्रुवारी २०१३ मध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पानंतर 1.8 टक्के इतकी घसरण झाली होती. सेन्सेक्समध्ये 30 पैकी 26 शेअरची विक्री होताना दिसली. तर निफ्टीतही 50 पैकी 44 शेअरची विक्री झाल्याचं दिसून आलं. बँकेच्या निफ्टीतील सर्व 12 शेअरमध्ये घसरण झाली आहे. त्यामुळे शेअर बाजार 40 हजार अंकांपर्यंत खाली घसरला तर निफ्टी 350 अंकांनी घसरून तो 11 हजार 650 च्या अंकावर आलेला आहे.

बाजारात सुरुवातीला म्हणजे 11 वाजता थोडी तेजी दिसली. पण त्यानंतरच्या तासाभरात बाजार पुन्हा थंड पडला. तर दुपारी एकनंतर सेंसेक्स 500 अंकांनी घसरला. त्यानंतरही ही घसरण काही थांबली नाही. त्यामुळे ऐतिहासिक घसरणीनंच अर्थसंकल्पाचा दिवस संपला.

ब्रेग्झीट आणि कोरोनाचा मोठा परिणाम

बजेटपूर्वीचा संपूर्ण आठवडा तसा थंडच राहिला. फारसा उत्साह दिसलाच  नाही. त्याची महत्वाची दोन कारणं होती. एक म्हणजे ब्रेग्झीट आणि दुसरं कोरोना व्हायरस. ब्रिटनने युरोपीय महासंघाला अलविदा केला असून ब्रेग्झीटच्या प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात झालीय. युरोपीय संघातून बाहेर पडणारा ब्रिटेन हा पहिला देश ठरलाय. ब्रिटनच्या जनतेनं 2016 रोजीच त्याच्या समर्थनार्थ मतदान केलं होतं. यातच चीनमधून सुरुवात झालेल्या कोरोना व्हायरसनं जगभरात अक्षरश थैमान घातलंय. त्याचा कहर अनेक देशांचं आर्थिक कंबरडंही मोडतोय. या जीवघेण्या व्हायरसनं आत्तापर्यंत शेकडो जणांचे जीव घेतलेत.

First published: February 1, 2020, 5:04 PM IST

ताज्या बातम्या