Home /News /money /

ITR 2022-23 : तुम्हाला ITR फाईल करताना फॉर्म-1 भरावा लागेल का? जाणून घ्या सविस्तर माहिती

ITR 2022-23 : तुम्हाला ITR फाईल करताना फॉर्म-1 भरावा लागेल का? जाणून घ्या सविस्तर माहिती

आता पॅन कार्ड नंबर टाका आणि Verify Your Identity पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर काही आवश्यक माहिती भरा आणि फी भरुन अकाउंट लॉगइन करा. आता समोर एक फॉर्म येईल, त्यावरुन तुमच्या अकाउंटवर किती लोन आहे याची माहिती मिळेल.

आता पॅन कार्ड नंबर टाका आणि Verify Your Identity पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर काही आवश्यक माहिती भरा आणि फी भरुन अकाउंट लॉगइन करा. आता समोर एक फॉर्म येईल, त्यावरुन तुमच्या अकाउंटवर किती लोन आहे याची माहिती मिळेल.

आयटीआर भरण्याची शेवटची मुदत 31 ऑक्टोबर 2022 आहे. करदात्यांनी विशेष परदेशी किंवा घरगुती ट्रान्झॅक्शन केली असतील, तर ते 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत आयटीआर भरू शकतात.

नवी दिल्ली, 29 जून : 2022-23 या मूल्यांकन वर्षासाठी आयटीआर (ITR 2022-23) भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ई-फायलिंग पोर्लटवर जाऊन करदाते आपला इन्कम टॅक्स रिटर्न अर्ज दाखल करू शकतात. सामान्य व्यक्तींसाठी 2021-22 या आर्थिक वर्षासाठी आयटीआर भरण्याची शेवटची मुदत (ITR filling last date) ही 31 जुलै 2022 आहे. तर, ज्यांच्या व्यवसायाला ऑडिट करण्याची गरज आहे, त्यांच्यासाठी आयटीआर भरण्याची शेवटची मुदत 31 ऑक्टोबर 2022 आहे. करदात्यांनी विशेष परदेशी किंवा घरगुती ट्रान्झॅक्शन केली असतील, तर ते 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत आयटीआर भरू शकतात. आयटीआर अर्ज दाखल करण्यासाठी ई-फायलिंग पोर्टलवर (ITR E-Filing portal) गेल्यास तुम्हाला दोन पर्याय दिसतात. आयटीआर फॉर्म-1 आणि आयटीआर फॉर्म-4. या दोन्हीपैकी एका फॉर्मची निवड तुम्हाला करायची असते. यातील फॉर्म-1 (ITR Form-1) हा कोणासाठी असतो, याबाबत आपण आज माहिती घेणार आहोत. PM Kisan Yojana: 11 वा हप्ता अद्याप मिळालेला नाही? येथे करा तक्रार, पैसे होतील जमा या करदात्यांनी निवडा फॉर्म-1 पगार, प्रॉपर्टी, व्याज किंवा शेतीमधून 5000 रुपयांपर्यंत झालेली कमाई गृहित धरून, एकूण इन्कम 50 लाख रुपयांच्या आत आहे, त्यांनी फॉर्म-1 ची निवड करायची (Who can select Form-1 for ITR) असते. बहुतांश करदाते याच फॉर्मची निवड करतात. फॉर्म-1 सिलेक्ट केल्यानंतर करदात्याशी संबंधित माहिती या फॉर्ममध्ये पहिल्यापासून भरलेली असते. मात्र, ही माहिती बरोबर आहे का याची पडताळणी करणे गरजेचे असते. जेणेकरून चुकीची माहिती तुम्ही दुरूस्त करू शकाल. या करदात्यांसाठी नाही फॉर्म-1 जर तुम्ही इंडिव्हिजुअल, एचयूएफ किंवा फर्म असाल, आणि तुमची इन्कम 50 लाख रुपयांपर्यंत असेल; आणि तुमची कमाई ही इन्कम सेक्शन 44AD, 44ADA किंवा 44AE च्या गणनेनुसार असलेल्या बिझनेस आणि प्रोफेशनमधून झाली आहे तर फॉर्म-1 तुमच्यासाठी नाही. अशा करदात्यांनी फॉर्म-4 सिलेक्ट (What is Form-4 in ITR) करून आयटीआर दाखल करावा. Investment Tips: दररोज वाचवा फक्त 200 रूपये अन् व्हा करोडपती! कसं ते जाणून घ्या कोणते डॉक्युमेंट्स आवश्यक? ई-फायलिंग पोर्टलवर आयटीआर दाखल करण्यासाठी तुमच्याकडे पॅन कार्ड, आधार कार्ड, फॉर्म 16, बँक अकाउंट डिटेल्स, गुंतवणुकीची पुराव्यांसह माहिती आणि अन्य इन्कम प्रूफ असायला (Documents needed to fill ITR) हवीत. आयटीआर दाखल करण्यासाठी तुमचे आधार आणि पॅन कार्ड लिंक असणे देखील गरजेचे आहे. तसेच, तुमचा ई-मेल आयडी प्राप्तीकर विभागाकडे रजिस्टर असायला हवा. अशा प्रकारे तुम्ही 2021-22 या वर्षासाठीचा आयटीआर दाखल करू शकता.
First published:

Tags: Income tax, Money, Tax

पुढील बातम्या