Home /News /money /

PM Kisan Yojana: 11 वा हप्ता अद्याप मिळालेला नाही? येथे करा तक्रार, पैसे होतील जमा

PM Kisan Yojana: 11 वा हप्ता अद्याप मिळालेला नाही? येथे करा तक्रार, पैसे होतील जमा

PM Kisan Yojana: 11 वा हप्ता अद्याप मिळालेला नाही? येथे करा तक्रार, पैसे होतील ख्यात्यात जमा

PM Kisan Yojana: 11 वा हप्ता अद्याप मिळालेला नाही? येथे करा तक्रार, पैसे होतील ख्यात्यात जमा

शेतकऱ्यांना (Farmers) आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Sanman Nidhi Yojana) योजनेचे आतापर्यंत 11 हप्ते (11th Instalment) आले आहेत. या योजनेंतर्गत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत करते. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये दिली जाते.

पुढे वाचा ...
  मुंबई, 28 जून : शेतकऱ्यांना (Farmers) आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Sanman Nidhi Yojana) योजनेचे आतापर्यंत 11 हप्ते (11th Instalment) आले आहेत. या योजनेंतर्गत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत करते. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. दरम्यान प्रधानमंत्री किसान योजनेचा 11वा हप्ता 2000 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होऊन महिना झाला. मात्र अजूनही काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत. पीएम किसान योजनेचे पैसे खात्यात न येण्याची अनेक कारणे असू शकतात. शेतकऱ्याने दिलेल्या कागदपत्रांमध्ये काही कमतरता असेल तरीही पैसे येत नाहीत. अनेकवेळा शेतकऱ्यांचे बँक खाते बंद झाल्यामुळे होऊनही त्यात पैसे येत नाहीत. म्हणूनच, जर तुम्हाला पीएम किसानचा 11 वा हप्ता अद्याप मिळाला नसेल, तर सर्वप्रथम तुमची स्थिती तपासायला हवी. तुम्ही हे ऑनलाइन करू शकता. तुमची सर्व कागदपत्रे बरोबर असतील तर तुम्ही त्याबद्दल तक्रार करून तुमचे पैसे मिळवू शकता. हेही वाचा: एका माशामुळे मच्छिमाराचं नशीब पालटलं; 3 तास चाललेल्या बोलीनंतर एवढा महाग विकला गेला एक मासा तुम्ही येथे तक्रार करू शकता- यावेळी अनेकांच्या बाबतीत असे घडले आहे की त्यांचे यापूर्वीचे हप्ते आले आहेत, मात्र 11 व्या हप्त्याचे पैसे अद्याप त्यांच्या बँक खात्यात आलेले नाहीत. तुमच्यासोबतही असे घडले असेल, तर तुम्ही पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक 011-24300606 वर कॉल करून तक्रार नोंदवू शकता. याशिवाय तुम्ही खालील नंबरवर संपर्क करून तुमची तक्रार नोंदवू शकता-
  • पीएम किसान टोल फ्री क्रमांक: 18001155266
  • पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक: 155261
  • पीएम किसान लँडलाइन क्रमांक: 011-23381092,23382401
  • पीएम किसानची नवीन हेल्पलाइन: 011-24300606
  • पीएम किसानची आणखी एक हेल्पलाइन आहे: 0120-6025109
  • ई-मेल आयडी: pmkisan-ict@gov.in
  हेही वाचा: New Labour Codes: ग्रॅच्युइटी एक वर्ष काम केल्यानंतर मिळणार? नवीन नियम लागू झाल्यास किती फायदा होईल आवश्यक ई-केवायसी करा- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आता EKYC अनिवार्य करण्यात आले आहे. जे शेतकरी eKYC करणार नाहीत, त्यांना पीएम किसानचा पुढील हप्ता मिळणार नाही. eKYC ची अंतिम तारीख ३१ जुलै २०२२ आहे. हे काम शेतकरी घरी बसून स्मार्टफोनच्या मदतीने करू शकतात. याशिवाय, ते कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट देऊन बायोमेट्रिक ईकेवायसी देखील करू शकतात.
  Published by:Suraj Sakunde
  First published:

  Tags: Farmer, PM Kisan

  पुढील बातम्या