मराठी बातम्या /बातम्या /मनी /Investment Tips: दररोज वाचवा फक्त 200 रूपये अन् व्हा करोडपती! कसं ते जाणून घ्या

Investment Tips: दररोज वाचवा फक्त 200 रूपये अन् व्हा करोडपती! कसं ते जाणून घ्या

Investment Tips: दररोज वाचवा फक्त 200 रूपये अन् व्हा करोडपती! कसं ते जाणून घ्या

Investment Tips: दररोज वाचवा फक्त 200 रूपये अन् व्हा करोडपती! कसं ते जाणून घ्या

Investment Tips: योग्यवेळी तुम्ही जर छोटी गुंतवणूक केली तर तुमची लाईफ सेट झालीच म्हणून समजा. जर तुम्ही पीपीएफ (PPF), एसआयपी (SIP), डायव्हर्सिफाईड फंड्समध्ये (Diversified Fund) दर महिन्याला 6000 रुपये गुंतवले तर नेमका किती परतावा मिळू शकतो ते जाणून घेऊयात.

पुढे वाचा ...

मुंबई, 28 जून : भरपूर पैसे कमवावेत आणि आयुष्य मजेत जगावं, असं प्रत्येकालाच वाटतं. कित्येक लोकांना तर करोडपती होण्याची स्वप्न पडतात. कित्येकजण आपलं हे स्वप्नं पूर्ण व्हावं, म्हणून देवापुढे प्रार्थना करत असतात. परंतु तुमचं हे स्वप्न खरंच पूर्ण झालं तर? हो तुमचं हे स्वप्न पूर्ण होऊ शकतं. तुम्ही फक्त गुंतवणुकीची (Investment) तयारी सुरू करा. आता गुंतवणूक म्हटलं की लगेच घाबरून जायचं कारण नाही. कारण तुम्हाला गुंतवणूकीसाठी मोठ्या रकमेची गरज नाही. योग्यवेळी तुम्ही जर छोटी गुंतवणूक केली तर तुमची लाईफ सेट झालीच म्हणून समजा. जर तुम्ही पीपीएफ (PPF), एसआयपी (SIP), डायव्हर्सिफाईड फंड्समध्ये (Diversified Fund) दर महिन्याला 6000 रुपये गुंतवले तर नेमका किती परतावा मिळू शकतो ते जाणून घेऊयात.

PPF मध्ये 15 वर्षांसाठी गुंतवणूक करा

जर तुम्ही पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) सारख्या योजनांमध्ये पैसे गुंतवले तर तुम्हाला मोठा परतावा मिळू शकतो. जर तुम्ही दररोज 200 रुपये म्हणजेच दरमहा 6000 रुपये गुंतवले तर वर्षभरातच तुमची गुंतवणूक 72,000 रुपये होईल. या गुंतवणूकीत सातत्य ठेवलं तर फक्त 15 वर्षांच्या कालावधीत तुम्ही 19 लाख 52 हजार 740 रुपये मिळवू शकता.

हेही वाचा- PM Kisan Yojana: 11 वा हप्ता अद्याप मिळालेला नाही? येथे करा तक्रार, पैसे होतील जमा

20 वर्षांपर्यंत गुंतवणूक-

जर तुम्ही PPF मध्ये 20 वर्ष पैसे जमा करत राहिलात तर हीच रक्कम  31 लाख 95 हजार 978 लाख रुपये होईल. आणखी ५ वर्षे वाढवली तर ही रक्कम तब्बल 49 लाख 47 हजार 847 रुपये होईल. PPF ही एक सुरक्षित गुंतवणूक आहे. पण दर तीन महिन्यांनी त्याचा व्याजदर निश्चित केला जातो. आपण सध्याच्या 7.1 टक्के व्याजदरानुसार गणना केली आहे, हा दर कमी जास्त होऊ शकतो.

हेही वाचा- New Labour Codes: ग्रॅच्युइटी एक वर्ष काम केल्यानंतर मिळणार? नवीन नियम लागू झाल्यास किती फायदा होईल

एसआयपीमध्ये (PPF) करा गुंतवणूक-

जर तुम्ही म्युच्युअल फंडात 25 वर्षांसाठी दर महिन्याला SIP मध्ये गुंतवणूक करायची केली तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 80 लाख 27 हजार 342 रुपये होते. इथे 10% वार्षिक परताव्याने कॅलक्युलेट केले जाते. आता जर तुम्ही ती 30 वर्षांसाठी वाढवली तर तुम्हाला 1 कोटी 36 लाख 75 हजार 952 रुपये परतावा मिळेल. पण, तज्ज्ञांच्या मते 10 टक्के परतावा हा अंदाजे आहे, यापेक्षा कितीतरी पटीने अधिक परतावा मिळू शकतो आणि आता विचार करा की दर महिन्याला 6000 ची एसआयरी केल्यास किती पैसे जमा होऊ शकतील.

डायव्हर्सिफाइड फंडामध्ये गुंतवणूक-

डायव्हर्सिफाइड फंडांना 12 टक्के परतावा मिळणे सामान्य आहे. या दरानुसार 25 वर्षांत ही रक्कम 1 कोटी 13 लाख 85 हजार 811 रुपये आणि 30 वर्षांत ही रक्कम वाढून 2 कोटी 11 लाख 79 हजार 483 रुपये होईल.

First published:

Tags: Investment, Savings and investments