मराठी बातम्या /बातम्या /मनी /घरबसल्या रेशन कार्डावर जोडा कुटुंब सदस्याचे नाव, वाचा काय आहे प्रक्रिया

घरबसल्या रेशन कार्डावर जोडा कुटुंब सदस्याचे नाव, वाचा काय आहे प्रक्रिया

देशातील अनेक नागरिकांसाठी रेशन कार्ड (Ration Card) एक महत्त्वाचा दस्तावेज आहे. दारिद्र्य रेषेखाली ज्यांचे नाव येते अशा वर्गासाठी रेशन कार्ड अत्यंत महत्त्वाचे आहे

देशातील अनेक नागरिकांसाठी रेशन कार्ड (Ration Card) एक महत्त्वाचा दस्तावेज आहे. दारिद्र्य रेषेखाली ज्यांचे नाव येते अशा वर्गासाठी रेशन कार्ड अत्यंत महत्त्वाचे आहे

देशातील अनेक नागरिकांसाठी रेशन कार्ड (Ration Card) एक महत्त्वाचा दस्तावेज आहे. दारिद्र्य रेषेखाली ज्यांचे नाव येते अशा वर्गासाठी रेशन कार्ड अत्यंत महत्त्वाचे आहे

    नवी दिल्ली, 27 जून : देशातील अनेक नागरिकांसाठी रेशन कार्ड (Ration Card) एक महत्त्वाचा दस्तावेज आहे. दारिद्र्य रेषेखाली ज्यांचे नाव येते अशा वर्गासाठी रेशन कार्ड अत्यंत महत्त्वाचे आहे. केंद्र सरकार लॉकडाऊनच्या (Coronavirus Lockdown) काळात या कार्डवर सामान्य नागरिकांना अन्नधान्याचे वाटप करत आहे, अशावेळी तुमच्याकडे रेशनकार्ड असणे गरजेचे आहे. कोणतीही गरीब व्यक्ती उपाशी राहू नये, असा सरकारचा मानस आहे. त्याचप्रमाणे अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड आवश्यक आहे. अशावेळी हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, तुमचे हे महत्त्वाचे कागदपत्र अपडेटेड असणे गरजेचे आहे. काही दिवसांपूर्वीच सरकारने 'वन नेशन, वन रेशन कार्ड' (One Nation One Ration Card)ची घोषणा केली होती. याअंतर्गत रेशन कार्ड होल्डर कोणत्याही राज्यात असल्यास त्याला तिथे त्या रेशन कार्डावर अन्नधान्य मिळवता येईल.

    (हे वाचा-सामान्यांच्या खिशावरील भार वाढला, सलग 21व्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले)

    अशावेळी कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे नाव रेशन कार्डावर टाकणे राहून गेले असेल, तर ते आता सोप्या पद्धतीने जोडणे शक्य आहे. ऑनलाइन पद्धतीने तुम्ही रेशन कार्डावर कुटुंबातील सदस्याचे नाव टाकू (Ration Card Update) शकता.

    कोणते दस्तावेज आवश्यक?

    -जर तुम्ही तुमच्या घरातील रेशन कार्डावर घरातील लहान मुलाचे नाव जोडू इच्छिता तर त्याकरता कुटुंब प्रमुखाचे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. याची एक फोटोकॉपी आणि ओरिजिनल असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे लहान मुलाचे/मुलीचा जन्मदाखला आणि आई-वडिलांचे आधार कार्ड (Aadhaar Card) आवश्यक आहे

    (हे वाचा-अलर्ट! SBI, PNB पाठोपाठ या सरकारी बँकेने दिला सायबर हल्ल्याचा इशारा)

    -जर घरामध्ये लग्न करून आलेल्या नवीन महिलेचं नाव रेशन कार्डावर जोडायचे असेल, तर तिचे आधार कार्ड आवश्यक आहे. त्याचप्रमाणे लग्नाचे प्रमाणपत्र, नवऱ्याच्या रेशन कार्डाची फोटोकॉपी आणि ओरिजिनल कॉपी लागेल. त्याचप्रमाणे तिचे नाव माहेरच्या रेशन कार्डावरून हटवल्याटे प्रमाणपत्र देखील गरजेचे आहे.

    रेशन कार्ड ऑनलाइन अपडेट कसे कराल?

    -सर्वप्रथम तुम्हाला संबधित राज्याच्या अन्न पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. त्याठिकाणी आयडी बनवून लॉग इन करा. काही मिनिटांमध्ये हे काम पूर्ण होईल.

    -लॉगइन केल्यानंतर या वेबसाइटच्या होमपेजवर नवीन सदस्याचे  नाव जोडण्याचा पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर एक फॉर्म ओपन होईल.

    (हे वाचा-नोकरदार वर्गासाठी महत्त्वाची बातमी! PF चे व्याजदर पुन्हा एकदा घटण्याची शक्यता)

    -हा फॉर्म तुम्हाला संबधित  नवीन सदस्याची पूर्ण माहिती देऊन भरावा लागेल.

    -पुढील स्टेपमध्ये तुम्हाला फॉर्ममध्ये आवश्यक त्या कागदपत्रांची फोटोकॉपी अपलोड करावी लागेल. त्यानंतर फॉर्म सबमिट करा.

    -फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल. ज्या नंबरचा वापर करून तुम्ही याच वेबसाइटवर तुमचा फॉर्म ट्रॅक करू शकता

    -हा फॉर्म आणि त्याबरोबर जोडण्यात आलेले दस्तावेज अधिकाऱ्यांकडून तपासण्यात येतील आणि त्यानंतर ही माहिती योग्य असल्यास तुमची रिक्वेस्ट स्विकारली जाईल. पोस्टाच्या माध्यमातून तुमच्या पत्त्यावर रेशन कार्ड पाठवण्यात येईल.

    संपादन - जान्हवी भाटकर

    First published:
    top videos

      Tags: Ration card