नवी दिल्ली, 26 जून : कोरोना व्हायरस पँडेमिक (Coronavirus Panemic) च्या संकटकाळात ऑनलाइन फसवणुकीचे (Online Fraud) प्रमाण वाढले आहे. लोकांना लाखोंचा गंडा घातल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे आता CBI प्रमाणेच देशातील महत्त्वाच्या बँकांनी देखील त्यांच्या ग्राहकांना अलर्ट करण्यास सुरुवात केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानंतर आता बँक ऑफ बरोडा (Bank of Baroda) या सरकारी बँकेने देखील सोशल मीडियावर पोस्ट करून आणि त्यांच्या ग्राहकांना मेसेज पाठवून या ऑनलाइन फसवणुकीबाबत अलर्ट केले आहे. फेक इमेल (Fake Email) संदर्भात देखील त्यांनी ग्राहकांना सूचना दिली आहे. याआधी केंद्र सरकारने देखील अॅडव्हायजरी जारी करून संभाव्य सायबर हल्ल्याबाबत सामान्य नागरिक आणि संस्थांना इशारा दिला आहे.
बँक ऑफ बरोडाने ट्वीट आणि मेसेज करून त्यांच्या ग्राहकांना अशी माहिती दिली आहे की, 'आमच्या माहितीमध्ये असे आले आहे की, देशामध्ये अनेक शहरांमध्ये मोठा सायबर हल्ला होऊ शकतो. तु्म्हाला ncov2019@gov.in या मेल आयडीवरून कोव्हिड-19 च्या मोफत तपासासाठी आलेल्या कोणत्याही मेलवर क्लिक करू नका'.
(हे वाचा-नोकरदार वर्गासाठी महत्त्वाची बातमी! PF चे व्याजदर पुन्हा एकदा घटण्याची शक्यता)
With the pandemic's grip tightening over the country, there are more rumours and fake emails being circulated about the same. #BankofBaroda encourages you against trusting or forwarding such emails or messages. #StaySafeBankSafe pic.twitter.com/56kseGdZJn
— Bank of Baroda (@bankofbaroda) June 21, 2020
बीओबीने त्यांच्या मेसेजमध्ये असे म्हटले आहे की, या हॅकर्सनी जवळपास 20 लाख भारतीयांचे मेलआयडी मिळवले आहेत. ते त्यांना कोरोनाची फ्री टेस्ट करून देतो सांगत त्यांची वैयक्तिक आणि बँकिंग संबधी माहिती मिळवत आहेत. बँकेच्या मते त्यांच्या निशाण्यावर मुंबई, दिल्ली, हैदराबाद, चैन्नई आणि अहमदाबाद या शहरातील ग्राहक आहेत.
(हे वाचा-खूशखबर! SBI मध्ये 445 पदांसाठी नोकरभरती, द्यावी लागणार नाही लेखी परीक्षा)
त्याचप्रमाणे बनावट वेबसाइटवर वैयक्तिक माहिती टाकल्यास मोठा आर्थिक तोटा झेलावा लागू शकतो. एखाद्या हॅकरकडे ग्राहकाची वैयक्तिक आणि बँकिंगची माहिती असल्याने तो ग्राहकाचे बँक खाते पूर्णपणे रिकामे देखील करू शकतो. त्यामुळे सावधान राहण्याचा इशारा या बँकिंग संस्था, सीबीआय आणि केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे.
संपादन - जान्हवी भाटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.