मराठी बातम्या /बातम्या /मनी /

नोकरदार वर्गासाठी महत्त्वाची बातमी! PF चे व्याजदर पुन्हा एकदा घटण्याची शक्यता

नोकरदार वर्गासाठी महत्त्वाची बातमी! PF चे व्याजदर पुन्हा एकदा घटण्याची शक्यता

तुम्ही जर नोकरदार वर्गातील असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून (Employee Provident Fund Organisation) पुन्हा एकदा व्याजदरामध्ये कपात केली जाऊ शकते.

नवी दिल्ली, 26 जून : तुम्ही जर नोकरदार वर्गातील असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून (Employee Provident Fund Organisation) पुन्हा एकदा व्याजदरामध्ये (FY20) कपात केली जाऊ शकते.  काही महिन्यांपूर्वी प्रोव्हिडंट फंडच्या व्याजदरामध्ये कपात झाली होती. हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे कारण गुंतवणुकीवर रिटर्न घटत आहे, कॅश फ्लो देखील कमी झाला आहे, यामुळे 60 मिलियन ग्राहकांच्या सेवानिवृत्तीच्या बचतीवरील पेमेंट कमी होईल. यासंदर्भात इकॉनॉमिक टाइम्सने वृत्त दिले आहे.

सूत्रांनी वृत्तपत्रास दिलेल्या माहितीनुसार व्याजदरांबाबत निर्णय घेण्यासाठी EPFO चा फायनान्स विभाग, इन्व्हेस्टमेंट विभाग आणि ऑडिट कमिटी लवकरच एक बैठक घेणार आहेत. यानंतर निर्णय घेतला जाईल की ईपीएफओ किती व्याजदर देऊ शकते.

(हे वाचा-सलग 20 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या आजचे दर)

मार्च महिन्याच्या सुरूवातीला नवीन व्याजदर 8.5 टक्क्यांची घोषणा करण्यात आली होती. मात्र अद्याप त्याकरता अर्थ मंत्रालयाची मंजूरी मिळाली नाही आहे. कामगार मंत्रालयाकडून तेव्हाच नोटिफाय केले जाईल जेव्हा अर्थ मंत्रालयाकडून मंजूरी मिळेल.

कोविड -19 (COVID-19) च्या संकटकाळात कर्मचारी आणि नियोक्ते यांना मदत करण्यासाठी मार्चपासून भविष्य निर्वाह निधीशी संबंधित काही उपाययोजनांची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे.  प्रॉव्हिडंट फंडाचे योगदान तीन महिन्यांपासून कर्मचारी आणि नियोक्ता यांच्या मूलभूत वेतनाच्या 12% वरून 10% पर्यंत कमी केले गेले आहे. त्याचप्रमाणे कामगार मंत्रालयाने (Ministry of Labour) ने जारी केलेल्या निवेदनानुसार आता ईपीएफओ देशातील कोणत्याही प्रादेशिक कार्यालयात केलेले दावे (Claims) निकाली काढण्यास सक्षम असेल. याअंतर्गत भविष्य निर्वाह निधी, पेन्शन, आंशिक पैसे काढणे याप्रकारचे ऑनलाईन दावे सुलभरित्या पूर्ण करता येतील.

(हे वाचा-खूशखबर! SBI मध्ये 445 पदांसाठी नोकरभरती, द्यावी लागणार नाही लेखी परीक्षा)

तसच निवृत्तीवेतनाचा जीवन दाखला सादर करण्यासाठी सामायिक सेवा केंद्रांचा (सीएससी) वापर EPFO करणार आहे. पेन्शन सुरू ठेवण्यासाठी ईपीएस पेन्शनर्सना दरवर्षी लाइफ प्रूफ द्यावा लागतो. सीएससी व्यतिरिक्त ईपीएस पेन्शनधारक 135 क्षेत्रीय कार्यालये, 117 जिल्हा कार्यालये आणि पेन्शन वितरित बँकांद्वारे लाइफ प्रूफ सादर करू शकतात. कोरोना काळात नोकरदार वर्गाला प्रोव्हिडेंट फंड (PF) मधून पैसे काढण्याची सूट दिली आहे. तुमच्यासमोर पैशांचे संकट आल्यास कोरोना काळात तुम्ही 75 टक्के पैसे काढू शकता.

First published:

Tags: Epfo, Epfo employee news, Epfo interest rates fall