SBI पाठोपाठ या बँकेच्या ग्राहकांसाठी खूशखबर, व्याजदरांमध्ये मोठी कपात

SBI पाठोपाठ या बँकेच्या ग्राहकांसाठी खूशखबर, व्याजदरांमध्ये मोठी कपात

स्टेट बँक ऑफ इंडियापाठोपाठ बँक ऑफ इंडियाने (BOI) रिझर्व्ह बँकेकडून करण्यात आलेल्या व्याजदरातील कपातीचा पूर्ण लाभ ग्राहकांना देण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 मार्च : बँक ऑफ इंडियाने (Bank of India) त्यांच्या ग्राहकांसाठी सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. बँक ऑफ इंडियाने रिझर्व्ह बँकेकडून करण्यात आलेल्या व्याजदरातील कपातीचा पूर्ण लाभ ग्राहकांना देण्याचा निर्णय घेतला आहे. BOI ने रविवारी एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट्समध्ये 75 BPS (Basis Points) अर्थात 0.75 टक्क्यांची कपात केली आहे. त्यामुळे एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट कमी होऊन 7.25 टक्के इतका झाला आहे. हा दर RBI च्या रेपो दराशी संलग्न आहे. व्याजदरातील ही कपात 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. 27 मार्च रोजी रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये 75 बीपीएसची कपात करत रेपो रेट 4.4 टक्के केला होता.

(हे वाचा-कोरोनाच्या संकटकाळात नोकरदारांसाठी खूशखबर! EPF खात्यातून काढू शकाल एवढी रक्कम)

बँकेने त्यांच्या सूचनेत सांगितले आहे की, एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट्समध्ये 75 BPS कमी करून 7.25 टक्के इतका करण्यात आला आहे. त्याचबरोबर आम्ही घर, वाहन आणि MSME ग्राहकांना आरबीआयद्वारे घोषित करण्यात आलेल्या व्याजदराच्या कपातीनुसार लाभ घेता येणार आहेत.

MCLR मध्ये 0.25 ची टक्क्यांची कपात

त्याचप्रमाणे बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट्स (MCLR) मध्ये 0.25 टक्क्यांची कपात केली आहे. बँक ऑफ इंडियाने एक वर्ष ते एक महिन्याच्या कालावधीसाठी ही कपात केली आहे. एका वर्षासाठी बँकेचा एमसीएलआर वार्षिक 7.95 टक्के झाला आहे. 1 एप्रिल 2020 पासून हे नवे दर लागू होणार आहेत.

SBI ने सर्वप्रथम घेतला निर्णय

SBI ने शुक्रवारी एक्सटर्नल आणि रेपो लिंक्ड लेंडिंग रेटमध्ये 75-75 बेसिस पॉईँट्सची कपात केली होती. नवीन लेंडिंग रेट्स 1 एप्रिलपासून लागू होणार असल्याची माहिती बँकेकडून देण्यात आली आहे. SBI चा एक्सटर्नल लेंडिंग रेट (EBR) 7.80 टक्क्यावरून कमी होऊन 7.05 टक्क्यांवर आला आहे. त्याचप्रमाणे रेपो लिंक्ड लेंडिग रेट (RLLR) 7.40 टक्क्यांवरून 6.65 टक्क्यांवर पोहोचला आहे.

First published: March 29, 2020, 5:02 PM IST
Tags:

ताज्या बातम्या