नवी दिल्ली, 13 जून : सर्व प्रकारच्या सेव्हिंग स्किम्समध्ये (Savings Schemes) फिक्स्ड डिपॉजिटला (Fixed Deposits) अनेकांची पसंती असते. बचतीसाठी FD सर्वच वयोगटातील लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. इतर स्किम्सच्या तुलनेत फिक्स्ड डिपॉजिट सुरक्षित आणि सर्वात कमी रिस्क असलेली योजना आहे, त्यामुळेच याला अनेकांकडून पसंती मिळते. कमी कालावधीपासून, दीर्घ काळापर्यंत यात गुंतवणूक करता येते.
दोन प्रकारच्या FD -
सामान्यपणे FD दोन प्रकारच्या असतात. क्युमुलेटिव्ह एफडी आणि दुसरी नॉन क्युमुलेटिव्ह एफडी आहे. यात तिमाही आणि वार्षिक आधारे व्याज मिळतं.
Fixed Deposit मध्ये गुंतवणुकीचे फायदे -
- फिक्स्ड डिपॉजिट गुंतवणुकीसाठी सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो.
- यात जमा रकमेवर कोणतीही रिस्क नसते. तसंच एका ठराविक कालावधीमध्ये रिटर्नही मिळतात.
- FD मध्ये गुंतवणूक केलेली रक्कम सुरक्षित असते, कारण शेअर बाजाराच्या चढ-उताराचा यावर कोणताही थेट परिणाम होत नाही.
- या स्किम्समध्ये गुंतवणुकदार महिन्याला व्याज घेऊ शकतात.
- एफडीवर मिळणारा व्याजदरही अधिक आहे. वरिष्ठ नागरिकांना यावर अधिक व्याज मिळतं.
- कोणत्याही एफडीमध्ये एकदा गुंतवणूक करावी लागते. जर आणखी रक्कम गुंतवायची असेल, तर दुसरी एफडी करावी लागते. आधीच्याच एफडीमध्ये रक्कम अॅड करता येत नाही.
- FD चा एक मॅच्युरिटी कालावधी असतो. ठरवलेल्या कालावधीपर्यंत पैसे जमा राहतात. ज्यावेळी गरज असेल, त्यावेळी पैसे काढतादेखील येतात. परंतु मॅच्युरिटी आधीच एफडी तोडल्यास, व्याजाचं नुकसान होऊ शकतं. यावर पेनल्टीही द्यावी लागते. ही पेनल्टी वेगवेगळ्या बँकेत वेगवेगळी आहे.
FD वर टॅक्सबाबत नियम -
फिक्स्ड डिपॉजिटवर 0 ते 30 टक्क्यांपर्यंत टॅक्स कट होतो. हा टॅक्स गुंतवणुकदाराच्या इनकम टॅक्स स्लॅबआधारे कट होतो. पॅन कार्ड कॉपी बँकेत जमा करावी लागते. जर पॅन कार्ड जमा केलं नाही, तर यावर 20 टक्के टीडीएस कट होतो. गुंतवणुकदाराला जर कर कपात टाळायची असेल, तर त्यासाठी त्यांनी फॉर्म 15A बँकेत जमा करावा. हे अशा लोकांसाठी लागू आहे, जे कोणत्याही इनकम टॅक्स स्लॅबमध्ये येत नाहीत. कर कपात टाळण्यासाठी वरिष्ठ नागरिक फॉर्म 15H जमा करू शकतात.
Published by:Karishma Bhurke
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.