नवी दिल्ली, 13 जून: सोने दरात गेल्या काही दिवसांपासून सतत घसरण होत आहे. आता सोने दरात (Gold price Today) घसरण झाल्याचा फायदा घेता येऊ शकतो. सध्या सोन्यात गुंतवणूक करुन किंवा दागिने खरेदी करुन चांगला नफा कमवता येऊ शकतो. यावेळी लग्नसमारंभासाठी दागिने खरेदी करत असाल, तर स्वस्तात सोनं खरेदीची संधी आहे. आज रविवारी मल्टी कमॉडिटी मार्केट (MCX) बंद आहे. मागील सत्रात सोने दर 318 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या घसरणीसह 48,880 रुपयांवर क्लोज झाला होता.
तर, मागील सत्रात चांदीचा जुलै फ्यूचर ट्रेड 217.00 रुपयांच्या तेजीसह 72,328.00 रुपयांवर क्लोज झाला होता.
ग्लोबल मार्केटमध्ये घसरण -
अमेरिकेत सोन्याचा व्यापार 21.21 डॉलरच्या घसरणीसह 1,876.87 डॉलर प्रति औंस रेटवर बंद झाला होता. तर चांदीचा व्यापार 0.04 डॉलरच्या घसरणीसह 27.92 डॉलरवर बंद झाला होता.
डिसेंबरमध्ये 53500 रुपयांवर पोहचू शकतो गोल्ड रेट -
मनी कंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार, सोन्याचे दर कंसोलिडेशनच्या काळातून जात असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. बुलियन एक्सपर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही घसरणीमध्ये सोन्यात गुंतवणूक करावी. डिसेंबर 2021 च्या अखेरीस सोने दर 53,500 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहचू शकतात.
IIFL Securities चे अनुज गुप्ता यांनी सांगितलं, की मीडियम आणि लाँग टर्मच्या दृष्टीने सोन्याचा आउटलुक सकारात्मक आहे. गुंतवणुकदारांनी घसरणीदरम्यान खरेदीची रणनीति आखली पाहिजे. देशांतर्गत बाजारात दिवळीपर्यंत सोन्याचा भाव 53,500 रुपयांपर्यंत पोहचू शकतो. 15 जुलै 2021 नंतर सोने दरात तेजी दिसू शकते, जी दिवाळीपासून या वर्षाच्या अखेरपर्यंत पीकवर राहू शकते, असंही अनुज गुप्ता यांनी सांगितलं.
Published by:Karishma Bhurke
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.