नवी दिल्ली, 13 जून : जर तुम्ही नोकरदार असाल, तर नोकरी करतानाच रिटायरमेंट प्लॅनिंगबाबतही विचार करू शकता. रिटायरमेंट प्लॅनिंग करताना वाढत्या महागाईकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी कॅपिटल मार्केटमध्ये अनेक पर्याय आहेत. परंतु हाय रिटर्न्स देण्यासह सुरक्षित पर्यायांमध्ये म्युच्यूअल फंड सामिल आहे. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) आणि त्यानंतर सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅनचा (SWP) पर्याय निवडू शकता.
रिटायरमेंट प्लॅनिंग एक लाँग टर्म Gaol आहे, जिथे गुंतवणुकदार 20 किंवा 25 वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधी लक्षात ठेऊन गुंतवणूक करतात. रिटर्न हिस्ट्री पाहिल्यास, म्युच्यूअल फंडमध्ये अशा अनेक स्किम आहेत, ज्यांनी अधिक कालावधीमध्ये 10 टक्क्यांहून अधिक वार्षिक रिटर्न दिले आहेत.
आधी SIP, नंतर SWP -
सर्वात आधी 20 वर्षांचं लक्ष्य ठेऊन एक SIP सुरू करावी लागेल. 20 वर्षानंतर SIP ची जी ओव्हरऑल व्हॅल्यू असेल, त्याच्यावर पुढील 20 वर्षांसाठी SWP पर्याय निवडावा लागेल. इथे आधी 20 वर्ष आणि नंतर 20 वर्षांसाठी अंदाजे रिटर्न 10 टक्के मानले गेले आहेत.
SWP द्वारे गुंतवणुकदारांना एक निश्चित रक्कम म्युच्यूअल फंड स्किममधून परत मिळते. किती वेळात किती पैसे काढायचे आहेत, हा पर्याय गुंतवणुकदारांना मिळतो. गुंतवणुकदार हे पैसे दररोज, आठवड्याला, महिन्याला, तिमाही, 6 महिन्याला किंवा वार्षिक बेसिसवर काढू शकतात. इथे महिन्याला असा पर्याय मानला गेला आहे.
पहिल्या 20 वर्षात SIP -
SIP मध्ये महिन्याला 4000 रुपये गुंतवणूक
गुंतवणुकीसाठी कालावधी- 20 वर्ष
अंदाजे रिटर्न - 10 टक्के वार्षिक
20 वर्षात एकूण गुंतवणूक - 960000 रुपये (9.6 लाख रु)
20 वर्षानंतर SIP व्हॅल्यू - 3062788 रुपये (30.6 लाख रु)
पुढील 20 वर्षापर्यंत SWP -
एकूण गुंतवणूक - 30.6 लाख रुपये
अंदाजे वार्षिक रिटर्न - 10 टक्के
वार्षिक रिटर्न - 3.06 लाख रुपये
मासिक रिटर्न - 3.06 लाख/12= 25500 रुपये
SWP रेग्युलर इनकम पर्याय -
SWP रेग्युलर इनकम मिळवण्याचा चांगला पर्याय आहे. पहिलीच गुंतवणूक केल्यानंतर हा पर्याय सुरू केला जाऊ शकतो. एखाद्या स्किममध्ये गुंतवणूक करत असाल, तर त्यात SWP पर्याय अॅक्टिवेट करू शकता. रेग्युलर कॅश फ्लोसाठी हे सुरू करता येतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.