जाहिरात
मराठी बातम्या / देश / पंतप्रधानांनी केली Health ID Card ची घोषणा, वाचा सामान्यांचा काय होणार फायदा

पंतप्रधानांनी केली Health ID Card ची घोषणा, वाचा सामान्यांचा काय होणार फायदा

पंतप्रधानांनी केली Health ID Card ची घोषणा, वाचा सामान्यांचा काय होणार फायदा

पंतप्रधानी घोषणा केलेल्या ‘नॅशनल डिजीटल हेल्थ मिशन’ (National Digital Health Mission) या अभियानाअंतर्गत देशातील प्रत्येक नागरिकाचे हेल्थ आयडी तयार केले जाणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 15 ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 74व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त (74th Independence Day) देशाला संबोधित करताना ‘One Nation One Health Card’ संदर्भात भाष्य केले.  One Nation One Ration Card सारखेच हे कार्ड असणार आहे. पंतप्रधानी घोषणा केलेल्या ‘नॅशनल डिजीटल हेल्थ मिशन’ (National Digital Health Mission) या अभियानाअंतर्गत देशातील प्रत्येक नागरिकाचे हेल्थ आयडी तयार केले जाणार आहे. देशातील प्रत्येक व्यक्तीची आरोग्यासंदर्भातील सर्व माहिती या प्लॅटफॉर्मवर असणार आहे. यामध्ये संबंधित व्यक्तीवर कोणते उपचार झाले आहेत, निदान काय आहे, कोणत्या उपचारांची आवश्यकता आहे यांसारखे डिटेल्स या कार्डमध्ये असतील. आजपासून या मिशनची सुरुवात होत असून आरोग्य क्षेत्रासाठी ही मोठी क्रांती असेल असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. याबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, नागरिकांचा उपचाराचा खर्च कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, त्यासाठी प्रत्येकाला एक आरोग्य आ़यडी दिले जाईल. संबंधित नागरिकाच्या स्वास्थ्याबाबत त्यात माहिती असेल. यामुळे त्याला उपचार घेणे सोपे होईल. (हे वाचा- कोरोनाच्या 3 लशी विविध टप्प्यात, भारतीयांपर्यंत पोहोचवण्याची तयारी पूर्ण- PM ) या अभिनयानाअंतर्गत उपचारामध्ये येणाऱ्या समस्या कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा सुविचारीत पद्धतीने विचार करण्यात येणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले. हेल्थ आयडी प्रत्येक भारतीयाच्या स्वास्थ्य खात्याप्रमाणे काम करेल. यातून अनेक उपचारासंबंधित समस्या सोडवल्या जातील.

जाहिरात

देशातील नागरिकांना हे स्वास्थ्य कार्ड बनवावे लागेल. याअंतर्गत होणारे उपचार आणि विविध चाचण्याची माहिती डिजिटली सेव्ह केली जाईल. याचा संपू्ण रेकॉर्ड ठेवला जाईल. यामुळे असा फायदा होईल की देशातील कोणत्याही रुग्णालयात तुम्ही उपचारासाठी गेल्यास तुम्हाला सर्व रिपोर्ट किंवा जुन्या टेस्टचे रिपोर्ट नेण्याची आवश्यकता नाही. तुमच्या युनिक आयडीच्या माध्यमातून डॉक्टरांना याबाबत माहिती मिळेल.

याप्रकारे काम करेल हेल्थ आयडी प्रत्येक व्यक्तीचा मेडिकल डेटा ठेवण्यासाठी रग्णालय, क्लिनिक, डॉक्टर हे एका सेंट्र सर्व्हरशी जोडले जातील. या अभियानाशी जोडले जाणे हे त्या रुग्णालयावर आणि संबंधित व्यक्तीवर अवलंबून असेल. प्रत्येक नागरिकाचा आयडी युनिक असेल. त्यावरच लॉग इन केल्यानंतर पुढील प्रक्रिया करता येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात