नवी दिल्ली, 17 जून: विविध आर्थिक व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड (
PAN Card) हे अत्यंत आवश्यक दस्तावेज आहे. केवायसी (
KYC) करण्यासाठी पॅन कार्डची आवश्यकता भासते. शिवाय आयटीआर (
Income Tax Return ITR) दाखल करण्यासाठी देखील पॅन कार्ड आवश्यक आहे. बँक खातं उघडणं, नवीन क्रेडिट-डेबिट कार्डसाठी देखील पॅनची आवश्यकता भासते. अशावेळी तुमचं पॅन कार्ड हरवलं, चोरीस गेलं किंवा तुम्ही ते कुठेतरी विसरलात तर मोठी गडबड होऊ शकते. काही कामं देखील खोळंबू शकतात. मात्र अशावेळी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही, तुम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंट (I
ncome Tax department) च्या नव्या पोर्टलवरून अर्थात incometax.gov.in वरुन तातडीने तुमचं ई-पॅन डाऊनलोड करू शकता.
पॅन क्रमांक आठवत नसेल तरीही करता येईल डाऊनलोड
तुमचं पॅनकार्ड चोरी झाल्यास किंवा तुम्ही ते कुठेतरी ठेवून हरवला किंवा विसरला असाल आणि अशावेळी जर तुम्हाला पॅन नंबर आठवत नसेल, तरीही चिंतेचं कारण नाही. अशा परिस्थितीत तुम्ही पॅन नंबरशिवाय ई-पॅन डाऊनलोड करू शकता. . यासाठी, तुमच्या पॅन कार्डसह आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे, अन्यथा तुम्ही ई-पॅन कार्ड काढण्यास सक्षम होणार नाही.
हे वाचा-RBI चा कोट्यवधी प्रीपेड मोबाईल ग्राहकांना दिलासा! ऑगस्ट महिन्यापासून होणार बदल
अशाप्रकारे काढता येईल ई-पॅन कार्ड
-ई-पॅन कार्ड काढण्यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्सच्या नव्या पोर्टलवर लॉगइन करावं लागेल.
-यानंतर 'Our Services' या पर्यायावर क्लिक करा.
-याठिकाणी डाव्या बाजूला तुम्हाला 'Instant E PAN’ चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा
-त्यानंतर नवीन पॅन कार्डच्या पर्यायावर क्लिक करा
-याठिकाणी तुमचा आधार कार्ड क्रमांक प्रविष्ट करा, जर तुम्हाला पॅन क्रमांक आठवत नसेल तर
-नियम व अटी व्यवस्थित वाचून Accept च्या पर्यायावर क्लिक करा
हे वाचा-Amazon, Flipkart विरोधातल्या तक्रारीचा त्वरित तपास करावा: CAIT चा सरकारला आग्रह
-तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर एक ओटीपी येईल तो प्रविष्ट करा.
-तपशील काळजीपूर्वक तपासा, आपला ई-मेल आयडी प्रविष्ट करा आणि 'सत्यापित करा' बटणावर क्लिक करा.
-तुमचं ई-पॅन तुमच्या दिलेल्या ई-मेल आयडीवर पाठविला जाईल. आपल्या ई-मेलवर लॉग इन करा आणि ई-पॅन पीडीएफ डाउनलोड करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.