Home /News /money /

पैशांची आवश्यकता असेल तर Gold Loan ठरेल चांगला पर्याय, एका क्लिकवर मिळवता येईल हे कर्ज

पैशांची आवश्यकता असेल तर Gold Loan ठरेल चांगला पर्याय, एका क्लिकवर मिळवता येईल हे कर्ज

AUGMONT- GOLD FOR ALL सारख्या कंपन्यांमध्ये तुम्ही ऑनलाइन किंवा App च्या साहाय्याने एका क्लिकच्या माध्यमातून गोल्ड लोन घेऊ शकता. जाणून घ्या सुवर्ण कर्जाचे आणखी काय फायदे आहेत आणि कोणत्या गोष्टी तुम्ही लक्षात घेणे आवश्यक आहे.

    मुंबई, 27 ऑगस्ट: अनेकदा पैशांची आवश्यकता असेल तर घरातील सोन्याचा वापर करता येतो. गोल्ड लोन हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. अनेक बँका आणि NBFC अगदी सोप्या कागदपत्रांसह आणि कमीतकमी व्याजदराने सुवर्णकर्ज (Gold Loan) देत आहेत. AUGMONT- GOLD FOR ALL सारख्या कंपन्यांमध्ये तुम्ही ऑनलाइन किंवा App च्या साहाय्याने एका क्लिकच्या माध्यमातून गोल्ड लोन घेऊ शकता. जाणून घ्या सुवर्ण कर्जाचे आणखी काय फायदे आहेत आणि कोणत्या गोष्टी तुम्ही लक्षात घेणे आवश्यक आहे. गोल्ड लोनचे फायदे >>आपात्कालीन परिस्थिती पैशांची आवश्यकता भासल्यास गोल्ड लोन एक चांगला पर्याय ठरेल >> सुवर्ण कर्ज मिळवण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळवही फार कमी करावी लागते >> इतर कर्जांच्या तुलनेत सुवर्ण कर्जावरील व्याज कमी असते आणि कर्जाची रक्कम सोन्याच्या शुद्धतेवर अवलंबून असते. 18 कॅरेट त्यापेक्षा अधिक शुद्धतेच्या कर्जावर चांगले लोन मिळते >> सुवर्ण कर्जाचे कॅलक्युलेशन प्रति ग्रॅमच्या हिशोबाने होते हे वाचा-PNB मध्ये FD करण्याचा विचार करताय? जाणून घ्या Fixed Deposit नवे व्याजदर >> गोल्ड लोनसाठी कोणत्याही क्रेडिट स्कोअरची आवश्यकता नसते आणि कर्जाच्या रकमेचं उद्दिष्ट्य सांगण्याचीही गरज नसते. >> बँका आणि NBFCs गोल्ड लोन उपलब्ध करुन देतात. यापैकी अनेक बँका आणि कंपन्या ऑनलाइन सुवर्णकर्ज उपलब्ध करून देतात एका क्लिकवर मिळवा सुवर्णकर्ज Augmont ऑनलाइन आणि डोअरस्टेप सर्व्हिस उपलब्ध करून देतं. कंपनीच्या वेबसाइट आणि App वरुन तुम्ही एका क्लिकवरुन गोल्ड लोनसाठी अर्ज करू शकता. याकरता तुम्हाला रहिवासी दाखल आणि एका ओळखपत्राची आवश्यकता भासेल. अर्ज केल्यानंतर तासाभरात कर्जाची रक्कम दिली जाते. यामध्ये तुम्ही मासिक, दोन महिने किंवा सहामाही पद्धतीने EMI भरू शकता. Augmont गोल्ड लोनवर केवळ 100  प्रोसेसिंग फी द्यावी लागेल. अगदी कमी व्याजासह कोणत्याही प्री-पेमेंट पेनल्टीवर तुम्हाला हे कर्ज मिळेल. यामध्ये कोणतेही हिडन चार्जेस नाही आहेत आणि ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शी आहे. यामध्ये दागिने चोरी होण्याचा किंवा स्वॅपिंगचा धोका नाही आहे. IDBI Trusteeship Services च्या वॉल्टमध्ये तुमचं सोनं सुरक्षित असेल. हे वाचा-Post Office च्या या पॉलिसीमध्ये दरमहा 1300 रुपये गुंतवून मिळवा 13 लाख या गोष्टी ठेवा लक्षात कर्ज घेताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. कर्ज घेण्यापूर्वी विविध बँक/NBFC चे सुवर्णकर्जावर असणारे व्याजदर तपासा. कोणत्याही प्रकारचा हिडन चार्ज तर तुम्हाला द्यावा लागणार नाही ना याची पडताळणी करुन घ्या. शिवाय प्री-पेमेंट, प्रोसेसिंग फी आणि री-पेमेंट शुल्काबाबतही सखोल माहिती मिळवा. याशिवाय ज्वेलरी स्वॅपिंग किंवा अन्य जोखीम असतील का याची पडताळणी करून घ्या. वेळेत जर कर्ज फेडले नाही तर कर्जदात्याकडे सोने विकण्याचा अधिकार असतो.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Loan, The gold

    पुढील बातम्या