मराठी बातम्या /बातम्या /मनी /

मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा, पुढील तीन वर्षात ग्रीन एनर्जीसाठी 75000 कोटींची करणार गुंतवणूक

मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा, पुढील तीन वर्षात ग्रीन एनर्जीसाठी 75000 कोटींची करणार गुंतवणूक

International Climate Summit: RIL चे चेअरमन मुकेश अंबानी यांनी पुढील तीन वर्षात मोठ्या क्षमतेचे उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी 75,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे.

International Climate Summit: RIL चे चेअरमन मुकेश अंबानी यांनी पुढील तीन वर्षात मोठ्या क्षमतेचे उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी 75,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे.

International Climate Summit: RIL चे चेअरमन मुकेश अंबानी यांनी पुढील तीन वर्षात मोठ्या क्षमतेचे उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी 75,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 03 सप्टेंबर: हवामान बदल (Climate Change) ही समस्या दीर्घकाळापासून संपूर्ण जगाची डोकेदुखी ठरत आहे. अनेक दशकांपासून मानव या संकटाशी सामना करत आहे. यासंदर्भात काही ठोस पावलं उचलण्याची आवश्यकताही आहे. दरम्यान क्लायमेट चेंजसंदर्भात होत असलेल्या जागतिक हवामान शिखर संमेलनात (ICS 2021) आज रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी हरित ऊर्जा क्षेत्रात मोठं पाऊल ठेवण्याची घोषणा केली आहे. मुकेश अंबानी यांनी पुढील तीन वर्षात मोठ्या क्षमतेचे उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी 75,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे.

या संमेलनादरम्यान बोलताना मुकेश अंबानी असं म्हणाले की, 'या समिटमध्ये बोलणं माझ्यासाठी अभिमानास्पद आहे'. त्यांनी असे म्हटले की आत्मनिर्भर भारताचे लक्ष्य जरूर पूर्ण होईल. हवामान बदल आज जगापुढे एक मोठं आव्हान आहे, ज्याच्याशी सामना करण्यासाठी आपल्याला ग्रीन एनर्जीचा लवकरात लवकर अवलंब करावा लागेल.

हे वाचा-Petrol-Diesel: पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर, मात्र दर सामान्यांना न परवडणारेच!

अंबानी आहेत परिषदेचे मुख्य प्रवक्ते

पीडीएच चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या (PDH Chamber of Commerce & Industry) पर्यावरण समितीच्या पुढाकाराने भारत आंतरराष्ट्रीय हवामान शिखर संमेलन 2021 चा भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करत आहे. या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. RIL चे अध्यक्ष मुकेश अंबानी हे शिखर परिषदेचे प्रमुख वक्ते आहेत.

3 वर्षात 75000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा

अंबानी यांनी पुढील तीन वर्षात मोठ्या क्षमतेचे चार उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी 75,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, RIL ग्रीन एनर्जीच्या क्षेत्रात काम करत आहे. पुढील तीन वर्षात 75,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आहे.

हे वाचा-LPG Gas Cylinder च्या सब्सिडीचे पैसे का मिळत नाही आहेत? वाचा काय आहे कारण

ICS दरम्यान मुकेश अंबानी म्हणाले की, 'नवीन ऊर्जा वातावरणासाठी आवश्यक असलेली सर्व महत्त्वाची उपकरणे तयार आणि एकत्रित करण्यासाठी आम्ही चार मोठ्या सोलर फोटोवोल्टिक मॉड्यूल फॅक्टरी, एनर्जी स्टोरेज बॅटरी फॅक्टरी, इलेक्ट्रोलायझर फॅक्टरी आणि इंधन सेल फॅक्टरी मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभारण्याची आमची योजना आहे.'

(डिस्क्लेमर- न्यूज18 लोकमत, रिलायन्स इंडस्ट्रीजची कंपनी नेटवर्क18 मीडिया अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडचा भाग आहे. नेटवर्क18 मीडिया अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडचा मालकी हक्क रिलायन्स इंडस्ट्रीजकडेच आहे.)

First published:

Tags: Mukesh ambani, Reliance, Reliance Industries