• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • ICICI बँकेचे शेअर ऑल टाईम हायवर; गुंतवणुकीबाबत तज्ज्ञांचं म्हणणं काय?

ICICI बँकेचे शेअर ऑल टाईम हायवर; गुंतवणुकीबाबत तज्ज्ञांचं म्हणणं काय?

ICICI बँकेने शनिवारी सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले. 30 सप्टेंबर 2021 रोजी संपलेल्या तिमाहीत ICICI बँकेचा Net Profit 30 टक्क्यांनी वाढून 5511 कोटी रुपयांवर पोहोचला.

 • Share this:
  मुंबई, 25 ऑक्टोबर : ICICI बँकेचे शेअर्स सध्या तेजीत आहेत. सोमवारी 25 ऑक्टोबर रोजी ICICI बँकेच्या शेअर्सनी ऑल टाईम हायवर (ICICI Bank Share on all time high) आहेत. बँकेच्या शेअर्समध्ये 12 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. ICICI बँकेचे शेअर्स सकाळी 11.49 वाजता 12.44 टक्क्यांनी वाढून 853.70 रुपयांवर व्यवहार करत होते. त्यामुळे ज्यांच्याकडे हे शेअर्स त्यांनी त्यांनी नक्की शेअर्स होल्ड (Share Buy or Hold) करावे की विकावे? आणि ज्यांना नवीन गुंतवणूकदारांना यात गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी ही योग्य वेळ आहे का याबद्दल तज्ज्ञांचं म्हणणं काय जाणून घेऊयात. ICICI बँकेने शनिवारी सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले. 30 सप्टेंबर 2021 रोजी संपलेल्या तिमाहीत ICICI बँकेचा निव्वळ नफा 30 टक्क्यांनी वाढून 5511 कोटी रुपयांवर पोहोचला. या दरम्यान बँकेला प्रोविजनिंग कमी करावी लागली, ज्यामुळे नफ्यात वाढ झाली आहे. सप्टेंबर 2021 च्या तिमाहीत ICICI बँकेची प्रोविजनिंग 9 टक्क्यांनी घटून 2714 कोटी रुपयांवर आली. तर एका वर्षापूर्वी याच तिमाहीत प्रोविजनिंग 2995 कोटी रुपये होती. 2021 मध्ये 25% ने कोसळला हा स्टॉक तरी Vijay Kedia यांनी वाढवली भागीदारी, तुमच्याकडे आहे का हा शेअर? या कालावधीत बँकेचा निव्वळ व्याज उत्पन्न 25 टक्क्यांनी वाढून 11,690 कोटी रुपये झाले आहे. एक वर्षापूर्वी आर्थिक वर्ष 2021 च्या सप्टेंबर तिमाहीत हे उत्पन्न 9366 कोटी रुपये होते. निव्वळ व्याज उत्पन्न म्हणजे कर्जावरील व्याजदर आणि ठेवीवरील व्याज यांच्यातील फरक असतो. तुमचे PF चे पैसे येतील धोक्यात जर शेअर केला यापैकी कोणताही नंबर, EPFO कडून अलर्ट मॉर्गन स्टॅनलीने ओव्हरवेट रेटिंग दिले MORGAN STANLEY ने ICICI बँकेवर ओव्हरवेट रेटिंग दिली आहे आणि शेअरची किंमत 900 ते 1025 पर्यंत वाढवण्याचे टार्गेट दिले आहे. त्यांनी म्हटलं की, बँकेच्या Net Impaired Loan Formation मध्ये झपाट्याने घट झाली. पीपीओपी मार्जिनमधील सुधारणेमुळे री-रेटिंग वाढू शकते. गोल्डमन सॅक्सची BUY रेटिंग GOLDMAN SACHS चे ICICI बँकेवर खरेदीचे रेटिंग दिले आहे आणि टार्गेट 773 वरुन 823 रुपयांपर्यंत वाढवले आहे. त्यांचे म्हणणे आहे की कंपनीचा नफा आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यांनी आर्थिक वर्ष 2022-24 साठी नफ्याचा अंदाज 5 टक्क्यांनी वाढवला आहे. बँकेने या तिमाहीत मालमत्तेवर 1.8 टक्के रिटर्न दिले आहे. CLSA ने देखील ICICI बँकेवर बाय रेटिंग दिले आहे आणि शेअरचे टार्गेट 1000 रुपयांवरून 1100 रुपये निश्चित केले आहे. बँकेत सध्या बँकिंग क्षेत्राची सर्वोत्तम वाढ दिसत आहे. CREDIT SUISSE ने देखील ICICI बँकेला आउटपरफॉर्म रेटिंग दिले आहे आणि शेअरचे टार्गेट 900 रुपये निश्चित केले आहे.
  Published by:Pravin Wakchoure
  First published: