नवी दिल्ली, 21 जुलै: केंद्र सरकारने अलीकडेच असा निर्णय घेतला होता की 16 जून 2021 पासून देशभरात केवळ बीआयएस हॉलमार्किंग (BIS hallmarking) असणाऱ्या सोन्याच्या दागिन्यांची विक्री होईल. अर्थात जूनमधील या तारखेपासून हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आले होते, त्यामुळे ज्वेलर्सना केवळ हॉलमार्क असणारे दागिने विकता येणार होते. दरम्यान अशी बातमी व्हायरल झाली आहे की सरकार गोल्ड हॉलमार्किंग संबंधातील (Gold jewellery) हॉलमार्किंगचा नियम मागे घेत आहे. मात्र मंगळवारी सरकारने असं स्पष्टीकरण देत या बातम्याचं खंडन केलं आहे. सरकारने असं म्हटलं आहे की सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग (Gold jewellery Hallmarking) अनिवार्य असणार आहे आणि वेगवेगळ्या टप्प्यांमधून देशभरात हा नियम लागू केला जाईल.
मंगळवारी सरकारने म्हटले आहे की सोन्याच्या दागिन्यांची हॉलमार्किंग 16 जूनपासून टप्प्याटप्प्याने राबविली जात आहे आणि हा नियम मागे घेण्यात येणार असल्याचं सांगणारं परिपत्रक बनावट आहे. एका अधिकृत निवेदनात सरकारने म्हटले आहे की, 'सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग अनिवार्य करण्याबाबत भारत सरकारने दिलेला आदेश मागे घेण्यात आल्याची बातमी सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली आहे, ती बातमी खोटी आहे.'
हे वाचा-Gold Price Today: सोन्याच्या किंमतींचा आलेख चढताच, आजही दर 47 हजारांपार!
256 जिल्ह्यात नियम लागू
सोन्याच्या दागिन्यांववर आणि कलाकृतींवर अनिवार्य हॉलमार्किंगचा नियम टप्प्याटप्प्याने लागू केला जात आहे. सरकारने पहिल्या फेजमध्ये 256 जिल्ह्यांचा समावेश केला आहे. या नियमाअंतर्गत कोणत्याही व्यापाऱ्याला हॉलमार्किंग नसणारे कोणतेही दागिने विकता येणार नाहीत. सोने व्यापाऱ्यांना 14, 18, 20, 22, 23 आणि 24 कॅरेट सोन्याचे दागिने विकण्यास परवानगी देण्यात आली आहे. गोल्ड हॉलमार्किंग देशातील सर्व सोने व्यापाऱ्यांना त्यांच्यकडील दागिने किंवा इतर कलाकृती विकताना लागू होईल. त्यांना बीआयएस स्टँडर्डचे मानक पूर्ण करणं आवश्यक असेल, तसं न केल्यास कठोर कारवाई देखील होऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold, Gold and silver prices today