मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Independence Day 2021: उपलब्ध होणार रोजगाराच्या संधी! PM Modi यांचा विशेष प्लॅन, 100 लाख कोटीच्या योजनेची घोषणा

Independence Day 2021: उपलब्ध होणार रोजगाराच्या संधी! PM Modi यांचा विशेष प्लॅन, 100 लाख कोटीच्या योजनेची घोषणा

Pradhan mantri gatishakti national master plan: पंतप्रधान गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅनची घोषणा करण्यात आली आहे. ही योजना औद्योगिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी आहे

    नवी दिल्ली, 15 ऑगस्ट: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रविवारी देशाच्या विकासासाठी पायाभूत सुविधांवर भर देणार असल्याचे म्हटलं. पंतप्रधानांनी देशातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात याकरता पंतप्रधान गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन (Pradhan mantri gatishakti national master plan) आखण्यात आल्याचं म्हटलं. 100 लाख कोटींच्या या योजनेमधून तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या जातील. पंतप्रधान गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन औद्योगिक उपक्रमांना चालना देण्यासाठी महत्त्वाचा ठरेल. त्यांनी असे देखील म्हटले आहे की, स्वातंत्र्याची 100 वर्ष पूर्ण होण्याआधी भारताला ऊर्जेसंबंधित आत्मनिर्भर करायचे आहे. 75व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त (Independence Day 2021) लाल किल्ल्यावरुन भाषण करताना पंतप्रधानांनी (PM Narendra Modi Speech) विविध विषयांवर भाष्य केले. त्यांनी असे म्हटले की, 'आधुनिक पायाभूत सुविधांसह पायाभूत क्षेत्रासाठी भारताला एक समग्र दृष्टिकोन आवश्यक आहे. गतिशक्ती - राष्ट्रीय मास्टर प्लॅन योजना लवकरच या दिशेने सुरू केली जाईल. 100 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या या योजनेमुळे लाखो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.' हे वाचा-75व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांकडून 75 Vande Bharat Express ची घोषणा गतिशक्ति योजनेतील महत्त्वाचे मुद्दे >>गतिशक्ती योजना समग्र पायाभूत सुविधेच्या विस्तारासाठी मदत करेल, यामुळे देशातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या जातील >> स्थानिक मॅन्युफॅक्चरर्सना आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी ही योजना मदत करेल आणि त्याचप्रमाणे भविष्यातील आर्थिक क्षेत्रातसाठी विविश शक्यता विकसीत करण्यासाठी मदत होईल >>नवीन युगातील तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर ही योजना भर देणार आहे हे वाचा-Independence Day 2021: पंतप्रधान नरेंद्र मोदी आजच्या भाषणात काय म्हणाले... >> येणाऱ्या काही दिवसातंच या उपक्रमाअंतर्गत विविध घोषणा केल्या जातील विकासाच्या दिशेने भारताची वाटचाल त्यांनी पुढे असे म्हटले की, 'आपल्याला विकासाच्या दिशेन पुढे जायचे आहे ज्यावेळी सर्व गावागावांमध्ये 100 टक्के रस्ते असतील, 100 टक्के लोकांकडे बँक खाते असेल, 100 टक्के लाभार्थ्यांकडे आयुष्मान भारत कार्ड असेल, 100 टक्के पात्र व्यक्तींकडे उज्ज्वला योजनेचे गॅस कनेक्शन असेल.' सरकार आपल्या विविध योजनांअंतर्गत गरिबांना पोषणयुक्त तांदूळ देईल असेही पंतप्रधान म्हणाले.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या