मुंबई, 6 ऑगस्ट : महागाईमुळे आधीच घराचं बजेट बिघडलेलं असताना बँकांनी कर्ज महाग केल्याने नागरिकांवर खर्जाचा बोजा वाढला आहे. त्यात काल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किरकोळ महागाई नियंत्रित करण्यासाठी रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.4 टक्के केला. त्याचा परिणाम आता दिसू लागला आहे. खाजगी क्षेत्रातील बँका ICICI बँक आणि पंजाब नॅशनल बँकेने कर्जदरात वाढ केली आहे.
ICICI बँकेने एका अधिसूचनेत म्हटले आहे की, ICICI बँक एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट (I-EBLR) रिझर्व्ह बँकेच्या वाढीव रेपो दरानुसार करण्यात आला आहे. I-EBLR वार्षिक 9.10 टक्के आहे. नवे दर 5 ऑगस्ट 2022 पासून लागू होणार आहेत.
EPFO: जुन्या कंपनीचा PF कसा करायचा विलीन? फक्त 5 मिनिटांचं आहे काम, नंतर मिळेल मोठं व्याज
PNB ने RLLR 7.40 टक्क्यांवरून 7.90 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे
सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेनेही दर वाढीबाबत माहिती दिली, "रिझर्व्ह बँकेने रेपो दर वाढवल्यानंतर, रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) देखील 7.40 टक्क्यांवरून 7.90 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. नवे दर 8 ऑगस्ट 2022 पासून लागू होणार आहेत.
Flight Ticket: राडाच! फक्त 9 रूपयांत परदेश प्रवास, ‘या’ एअरलाइननं आणल्यात जबरदस्त ऑफर्स
RBI ने रेपो रेट 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.4 टक्के केला
रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी रेपो रेट 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.4 टक्के केला. रेपो दर 3 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. कोरोना काळात रेपो दरात कपात करण्यात आली होती. मात्र आता कोरोना पूर्वीचा दर आता लागू झाला आहे. यामुळे कर्जाचा मासिक हप्ता वाढणार आहे. यासोबतच चलनविषयक धोरण समितीने (MPC) मवाळ धोरण मागे घेण्यावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. एमपीसीच्या तीन दिवसीय बैठकीत घेतलेल्या निर्णयाची माहिती देताना, आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, एमपीसीने एकमताने रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.4 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय अर्थव्यवस्था उच्च महागाईशी झुंज देत आहे आणि ती नियंत्रणात आणणे आवश्यक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Icici bank, Pnb bank, Rbi, Repo rate