- मुंबई
- पुणे
- छ. संभाजी नगर
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- देश
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
Flight Ticket: राडाच! फक्त 9 रूपयांत परदेश प्रवास, ‘या’ एअरलाइननं आणल्यात जबरदस्त ऑफर्स

India to Vietnam Flight Ticket: व्हिएतजेट भारत आणि व्हिएतनाम दरम्यान 17 मार्गांवर थेट उड्डाणे चालवणार आहे. या ऑफरअंतर्गत 4 ऑगस्टपासून तिकीट बुकिंग सुरू झाली आहे.
- News18 Lokmat
- Last Updated: Aug 6, 2022 01:27 PM IST
मुंबई, 6 ऑगस्ट: परदेशात फिरायला जायचं अनेकांचं स्वप्न असतं. पण अनेकांसाठी हे स्वप्न स्वप्नच राहतं आणि यामागं पैसे नसणं हेच मुख्य कारण असतं. तुमचीही परदेशात फिरायला जायची इच्छा केवळ आर्थिक कारणांमुळं अपूर्ण राहिली असेल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. एका एअरलाइननं प्रवाशांसाठी खास ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गत तुम्ही फक्त 9 रुपयांमध्ये विमान प्रवास करून परदेशात पोहोचू शकता. एक आंतरराष्ट्रीय विमान कंपनी भारत ते व्हिएतनाम (India to Vietnam) फक्त 9 रुपयांमध्ये प्रवास करण्याची संधी देत आहे. व्हिएतजेट एअरलाइनने (Vietjet Airlines) केवळ 9 रुपयांमध्ये विमान तिकिटांची ऑफर आणली आहे. तुम्ही व्हिएतनामला भेट देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता.
ऑफर किती काळ आहे?
व्हिएतजेट भारत आणि व्हिएतनाम दरम्यान 17 मार्गांवर थेट उड्डाणं चालवणार आहे. या ऑफरअंतर्गत 4 ऑगस्टपासून तिकीट बुकिंग सुरू झाली आहे. ही ऑफर 26 ऑगस्टपर्यंत वैध असेल. याचा अर्थ तुम्ही बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार 4 ते 26 ऑगस्ट दरम्यान तिकीट बुक करून या ऑफरचा लाभ घेऊ शकता.
प्रचारात्मक तिकीट ऑफर
विमान कंपनीनं सांगितलं की, व्हिएतजेट भारत ते व्हिएतनाम प्रवासासाठी 30,000 प्रमोशनल तिकिटे देत आहे. या तिकिटांच्या किमती 9 रुपयांपासून सुरू होत आहेत. या अंतर्गत 15 ऑगस्ट 2022 ते 26 मार्च 2023 पर्यंत कोणीही प्रवासासाठी तिकीट बुक करू शकतो. तिकीट बुकिंगची ऑफर फक्त 26 ऑगस्टपर्यंत आहे.
व्हिएतनाममध्ये भारतीय मोठ्या संख्येने पोहोचले आहेत-
व्हिएतजेटचे कमर्शियल डायरेक्टर जय एल लिंगेश्वर यांनी सांगितले की, एअरलाइन भारत आणि व्हिएतनाम दरम्यान 17 मार्गांवर उड्डाणं चालवणार आहे. भारतातील पाच प्रमुख शहरांतील प्रवासी आता डा नांग के या सुंदर किनारपट्टीवरील शहराला भेट देण्यासाठी थेट विमानप्रवास करू शकतात. व्हिएतनामचे राजदूत फाम सॅन चाऊ यांच्या मते, भारतीय पर्यटकांमध्ये व्हिएतनाम एक उत्तम पर्यटन देश म्हणून उदयास येत आहे. भारतातून जाणाऱ्यांसाठी व्हिएतनाममध्ये व्हिसा प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. व्हिएतनामला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज येत आहेत.
या मार्गांवर उड्डाणे असतील उपलब्ध-
व्हिएतजेट 17 आणि 18 ऑक्टोबरपासून मुंबई आणि देशाची राजधानी दिल्ली ते दा नांग यांना जोडणारी विमानसेवा सुरू करणार आहे. व्हिएटजेट 28, 29 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर रोजी बेंगळुरू, हैदराबाद आणि अहमदाबाद येथून दा नांगसाठी आणखी तीन नवीन मार्गांसाठी सेवा सुरू करणार आहे. व्हिएतजेट एअरलाइनच्या म्हणण्यानुसार, या वर्षी सप्टेंबरपासून दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद आणि अहमदाबाद ते व्हिएतनाममधील होची मान्ही सिटी, हनोई, दा नांग, फु क्वोक या विमानसेवाही सुरू होतील.