जाहिरात
मराठी बातम्या / मनी / आइस्क्रीमसाठी आता मोजावे लागणार जास्त पैसे, गारेगार हवेत खिशाला चटके

आइस्क्रीमसाठी आता मोजावे लागणार जास्त पैसे, गारेगार हवेत खिशाला चटके

आइस्क्रीमसाठी आता मोजावे लागणार जास्त पैसे, गारेगार हवेत खिशाला चटके

दुधानंतर आता देशभरात आइसक्रीमचे भाव वाढणार आहेत. आइसक्रीम बनवणाऱ्या कंपन्या आइसक्रीमच्या किंमती 8 ते 15 टक्क्यांनी वाढवण्याच्या तयारीत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 3 जानेवारी : दुधानंतर आता देशभरात आइस्क्रीमचे भाव वाढणार आहेत. आइस्क्रीमचे बनवणाऱ्या कंपन्या आइसक्रीमच्या किंमती 8 ते 15 टक्क्यांनी वाढवण्याच्या तयारीत आहेत. आइसक्रीमच्या किंमतींमधली ही वाढ मुख्यत: इनपुट कॉस्ट वाढल्यामुळे झालीय. स्किम्ड मिल्क पावडर (Skimmed Milk Powder)चे दर वाढल्यामुळे आणि महागाईच्या कारणांमुळे कंपन्या त्यांच्या उत्पादनांचे दर वाढवातायत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आइसक्रीम आणि फ्रोझन डेझर्ट्समध्ये ही दरवाढ होऊ शकते. गुजरातमधली आइसक्रीम बनवणारी कंपनी वाडीलाल (Vadilal)च्या आइसक्रीमच्या किंमतींमध्ये 8 ते 10 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. अमूलनेही दरवाढ करण्याचा निर्णय 2 वर्षांनी घेतला आहे. कंपन्यांच्या ग्राहकांवर भार आइसक्रीम कंपन्यांनी याआधीच काही प्रमाणात दरवाढ केली आहे.बाकीची दरवाढ जानेवारीत केली जाईल. मदर डेअरीने हा दरवाढीचा भार ग्राहकांवर टाकला आहे. इनपुट कॉस्टमध्ये झालेल्या दरवाढीसोबतच आम्ही ग्राहकांचा खर्चही वाढवला आहे, असं मदर डेअरीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.स्किम्ड मिल्क पावडरच्या किंमतीत मोठी वाढ झालीय. मागच्या वर्षीच्या तुलनेत स्कीम्ड मिल्क पावडरच्या किंमती 330 रुपये प्रतिकिलो झाल्यात. त्यामुळे आइसक्रीम बनवणाऱ्या कंपन्यांवर याचा दबाव आला. (हेही वाचा : नोकरी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, मोदी सरकार सुटीबद्दलचा नियम बदलण्याची शक्यता) दुधाचे दर वाढले अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या किंमतींमध्ये 2 ते 3 रुपयांची वाढ केली. यावर्षी देशभरात दुधाचं उत्पादन कमी झालंय. प्रतिकूल हवामानामुळे जनावरांच्या चाऱ्याच्या किंमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे एकूणच दुग्धउत्पादन महागलं आहे. (हेही वाचा : विमानाने प्रवास करण्याचा प्लॅन आहे का? तिकीट बुक करण्याआधी वाचा ही बातमी) ====================================================================================

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात