Home /News /money /

विमानाने प्रवास करण्याचा प्लॅन आहे का? तिकीट बुक करण्याआधी वाचा ही बातमी

विमानाने प्रवास करण्याचा प्लॅन आहे का? तिकीट बुक करण्याआधी वाचा ही बातमी

नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून रेल्वेचं तिकीट आणि LPG सिलेंडर महागलं आहे. आता यानंतर विमान प्रवासही महागणार आहे.

    नवी दिल्ली, 3 जानेवारी : नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून रेल्वेचं तिकीट आणि LPG सिलेंडर महागलं आहे. आता यानंतर विमान प्रवासही महागणार आहे. विमानासाठीच्या इंधनाची दरवाढ झालीय. Aviation Turbine Fuel (ATF)ची किंमत 1637.25 रुपये प्रति किलो लीटर झालीय. या दरात 2.6 टक्क्यांची वाढ झालीय. तेलाची किंमत वाढल्याने विमानाचं भाडं वाढण्याची शक्यता आहे. हे इंधन सध्या 64.32 रुपये प्रति लीटर है. म्हणजे हे पेट्रोल आणि डिझेलपेक्षाही स्वस्त आहे. विमानाचं इंधन महागणार पेट्रोलची किंमत 75. 25 रुपये प्रतिलिटर आणि डिझेलची किंमत 68.10 रुपये प्रतिलिटर आहे. याशिवाय विनाअनुदानित LPG सिलेंडरही महाग झालंय. त्याची किंमत 19 रुपये प्रतिसिलेंडर एवढी वाढली आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झालीय.भारत 84 टक्के कच्चं तेल आयात करतो. यामध्ये मागच्या महिन्यात पुन्हा भाव वाढले. विमानासाठी लागणाऱ्या इंधनातही वाढ होणार आहे. त्यामुळेच विमान प्रवास महाग होऊ शकतो. सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचं स्वागत यामुळे सध्या अजूनही पर्यटनाचा हंगाम आहे. त्यातच आता विमान प्रवास महाग होणार असल्याने पर्यटनासाठी जास्त बजेट राखून ठेवावं लागणार आहे. (हेही वाचा : नोकरी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, मोदी सरकार सुटीबद्दलचा नियम बदलण्याची शक्यता) एअर इंडिया संकटात जेट एअरवेजनंतर एअर इंडियासारखी देशातली सर्वात मोठी एअरलाइन संकटात आहे. एअर इंडिया विकत घेणारा कुणी गुंतवणूकदार सापडला नाही तर ही कंपनी बंद पडण्याची शक्यता आहे. अशातच आता विमान प्रवास महागण्याची चिन्हं असल्याने विमान उद्योगावर याचा एकूणच परिणाम होणार आहे. (हेही वाचा : सरकारी पेन्शन योजनेत होणार मोठे बदल, करमुक्तीसोबत हेही फायदे) ======================================================================================
    Published by:Arti Kulkarni
    First published:

    Tags: Air india, Money

    पुढील बातम्या