जाहिरात
मराठी बातम्या / मनी / बँकांमध्ये नोकरीची मोठी संधी, 'असा' करा अर्ज

बँकांमध्ये नोकरीची मोठी संधी, 'असा' करा अर्ज

बँकांमध्ये नोकरीची मोठी संधी, 'असा' करा अर्ज

आयबीपीएस आरआरबी परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालीय

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 18 जून : आयबीपीएस आरआरबी परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालीय. RRB परीक्षांद्वारे ग्रामीण बँकांमध्ये भरती केली जाते. ही पदं आहेत ऑफिसर आणि ऑफिस असिस्टंट. या पदांसाठी उमेदवाराची निवड प्रीलिम्स परीक्षा, मेन्स परीक्षा आणि इंटरव्ह्यूच्या आधारे होईल. ऑफिसर ( स्केल I,II आणि III ) आणि ऑफिस असिस्टंट ( मल्टिपर्पज ) या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी आॅनलाइन अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 4 जुलै. पदाचं नाव ऑफिसर ( स्केल I,II आणि III ) आणि ऑफिस असिस्टंट ( मल्टिपर्पज ) CNG कार्सवरचा GST होऊ शकतो कमी, कारण… शैक्षणिक पात्रता कुठल्याही मान्यताप्राप्त संस्थेची पदवी, B.E./B.Tech, LLB, CA, MBA असलेले अर्ज करू शकतात. भारतात नोकरी करण्याची भारी संधी, या 10 कंपन्यांबद्दल एकदा जाणून घ्याच वय कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 40 वर्ष. अशी होईल निवड उमेदवाराची निवड प्रीलिम्स परीक्षा, मेन्स परीक्षा आणि इंटरव्ह्यूच्या आधारे होईल. ‘ही’ आहे लोकप्रिय काॅलेजेसची कटऑफ लिस्ट, काॅमर्सला जास्त पसंती अर्जाची फी जनरल, ओबीसी, ईडब्लूएस - 600 रुपये एससी, एसटी, पीडब्ल्यूडी - 100 रुपये कसा करायचा अर्ज? ऑफिस असिस्टंट - https://ibpsonline.ibps.in/rrbb8oajun19/ ऑफिसर स्केल 1 - https://ibpsonline.ibps.in/rrb8as1jun19/ ऑफिसर स्केल 2,3 - https://ibpsonline.ibps.in/rrb8a23jun19/ या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर Click here for New Registration वर क्लिक करा. त्यात तुमचं नाव, मोबाइल नंबर, ईमेल आयडी आणि इतर माहिती भरा. फोटो आणि सही अपलोड करा. अर्जाची फी भरा. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळेल. त्याच्या मदतीनं लाॅग इन करा आणि अर्जाच्या फाॅर्ममध्ये बदल करू शकता. प्रिंट आऊटही घेऊ शकता. VIDEO : हे तर धनंजय मुंडेंचं अज्ञान, चंद्रकांत पाटील भडकले

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात