CNG कार्सवरचा GST होऊ शकतो कमी, कारण...

भारताच्या आॅटो सेक्टरची सर्वात मोठी कंपनी मारुतीनं या बजेटमध्ये सरकार GST दर कमी करेल अशी आशा व्यक्त केलीय.

News18 Lokmat | Updated On: Jun 18, 2019 04:27 PM IST

CNG कार्सवरचा GST होऊ शकतो कमी, कारण...

मुंबई, 18 जून : मोदी सरकारचं पूर्ण बजेट येत्या 5 जुलैला सादर होतंय. भारताच्या आॅटो सेक्टरची सर्वात मोठी कंपनी मारुतीनं या बजेटमध्ये सरकार GST दर कमी करेल अशी आशा व्यक्त केलीय. कंपनीची इच्छा आहे की CNG कार्सवर GSTचा सध्याचा दर 28 टक्क्यांवरून 18 टक्के करावा. CNBC TV 18ला दिलेल्या मुलाखतीत मारुती सुझुकीचे चेअरमन आर. सी. भार्गव यांनी सांगितलं की, CNG कार्सवर GST कमी करायला हवं. त्यामुळे इम्पोर्ट बिल आणि प्रदूषण कमी होईल.

इलेक्ट्रिक कार्सची मागणी वाढावी यासाठी सरकारनं त्यावर फक्त 12 टक्के GST लावला आहे. तर CNG च्या कार्सवर 28 टक्के GST लावला जातो. हायब्रिड कार्सवर सध्या 43 टक्के कर लागतो. त्यात 28 टक्के GST आहे.

भारतात नोकरी करण्याची भारी संधी, या 10 कंपन्यांबद्दल एकदा जाणून घ्याच

'या' बँकांमधल्या तुमच्या पैशावर आता मिळणार कमी व्याज

CNG टेक्नाॅलाॅजी पर्यावरणासाठी चांगली

Loading...

भार्गव यांनी सांगितलं, CNG टेक्नाॅलाॅजी योग्य प्रकारे काम करतेय. ग्राहकही CNG कार्स खरेदी करून खूश आहेत. CNG कार्समुळे कच्च्या तेलाची आयात कमी होईल. CNG कच्च्या तेलापेक्षा स्वस्त आहे. पर्यावरणासाठी ते उत्तम आहे.

राज्याचा अर्थसंकल्प फुटला का? मुख्यमंत्र्यांनी केला खुलासा

भार्गव यांनी सांगितलं की CNG कार्सची विक्री वाढावी म्हणून GST ला 28 टक्क्यांवरून 18 टक्के करावं.

10 वर्षांत भारताकडे 10 हजार CNG स्टेशन्स होतील - धर्मेंद्र प्रधान

पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले, बायोफ्युएल, बायो CNG, एथेनाॅल, मिथेनाॅल यांना प्रोत्साहन देणं चांगलंच. गेल्या वर्षी ते म्हणाले होते की पुढच्या 10 वर्षात भारताकडे 10 हजार CNG स्टेशन्स  असतीस. सध्या फक्त 1762 स्टेशन्स आहेत आणि CNG कार्सची संख्या 33,64,256 आहे.


VIDEO : राष्ट्रवादी आणि ABVP च्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 18, 2019 04:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...