Home /News /money /

ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी RBI चा नवीन नियम लवकरच लागू होणार; काय आहे नियम?

ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी RBI चा नवीन नियम लवकरच लागू होणार; काय आहे नियम?

एक टोकन फक्त एका कार्डसाठी आणि एका व्यापाऱ्यासाठी वैध आहे. तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड एका ई-कॉमर्स साइटसाठी टोकनाइज केल्यास, त्याच कार्डावर दुसऱ्या साइटवर वेगळे टोकन असेल.

    मुंबई, 8 जून : ऑनलाइन पेमेंट (Online Payment) करणाऱ्या सर्वांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने ई कॉमर्स वेबसाइटवर ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी कार्ड टोकनाइज्ड (Card Tokenization) करण्याचा आदेश जारी केला आहे. RBI चा हा नवा नियम 1 जुलै 2022 पासून देशभर लागू होणार आहे. याचा अर्थ जर तुम्ही ई-कॉमर्स पोर्टलवर (E-commerce Portal) खरेदी करत असाल तर तुम्हाला कार्ड टोकनाइज्ड करणे आवश्यक आहे. टोकनायझेशन म्हणजे काय? टोकनायझेशन म्हणजे क्रेडिट आणि डेबिट कार्डचे  (Credit-Debit Card Detail) तपशील टोकन नावाच्या पर्यायी कोडसह बदलणे. या व्यवस्थेअंतर्गत, ऑनलाइन व्यापाऱ्यांना आता त्यांच्या ग्राहकांचे कार्ड त्यांच्या प्लॅटफॉर्मवर स्टोअर करण्यासाठी कार्ड डेटाऐवजी टोकन क्रमांक वापरावे लागतील. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांचा मुक्काम असलेले Westin हॉटेल आहे तरी कसं? एका दिवसासाठी साधारण किती खर्च येतो? टोकनायझेशनचे फायदे काय आहेत? कार्डची माहिती शेअर केल्याने फसवणूक होण्याची अधिक शक्यता असते. अशा परिस्थितीत, फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी, आरबीआयने व्यापाऱ्यांना ऑनलाइन पेमेंटसाठी विशेष कोड स्टोअर करण्याचे निर्देश दिले आहेत, जो तुमचा मूळ कार्ड क्रमांक नसेल. Tata ग्रुपच्या 'या' कंपनीमुळे गुंतवणूकदार बनले कोट्यधीश, 17 रुपयांचा शेअर 8600 रुपयांवर टोकन कुठे वैध असेल? एक टोकन फक्त एका कार्डसाठी आणि एका व्यापाऱ्यासाठी वैध आहे. तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड एका ई-कॉमर्स साइटसाठी टोकनाइज केल्यास, त्याच कार्डावर दुसऱ्या साइटवर वेगळे टोकन असेल. हे फसवणूक टाळण्यासाठी आहे. याव्यतिरिक्त, आपण व्यवहार करण्यासाठी कोणत्याही कार्डवर टोकनची रिक्वेस्ट करू शकता. टोकनसाठी शुल्क आकारले जाईल का? कार्ड टोकन करण्यासाठी कोणतेही सेवा शुल्क आकारले जाणार नाही. ते पूर्णपणे मोफत असेल. कार्ड टोकन करणे अनिवार्य आहे का? नाही, ते आवश्यक नाही. तुम्ही ऑनलाइन खरेदी करता तेव्हा, तुम्ही एकतर टोकन तयार करु शकता आणि तुमच्या भविष्यातील वापरासाठी ते एका विशिष्ट वेबसाइटवर स्टोअर करु शकता. जेव्हा तुम्ही एखादी वस्तू खरेदी करता तेव्हा तुम्ही तुमच्या कार्डचे तपशील टाकता. मात्र आता आरबीआयने 30 जून 2022 पूर्वी स्टोअर केलेला कोणताही डेटा हटवण्याचे निर्देश दिले आहेत.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Money, Online payments, Rbi, Reserve bank of india

    पुढील बातम्या