जाहिरात
मराठी बातम्या / मनी / RBI Hike Repo Rate: RBI कडून रेपो दरात 50 बेसिस पॉईंटची वाढ, EMI चा बोजा वाढणार

RBI Hike Repo Rate: RBI कडून रेपो दरात 50 बेसिस पॉईंटची वाढ, EMI चा बोजा वाढणार

RBI Hike Repo Rate: RBI कडून रेपो दरात 50 बेसिस पॉईंटची वाढ, EMI चा बोजा वाढणार

RBI च्या या निर्णयामुळे सर्वच बँकाचे कर्जाचे व्याजदार पुन्हा वाढतील. त्यामुळे EMI चा अतिरिक्त बोजा सर्वसामान्यांवर पडणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 8 जून : गगनाला भिडलेल्या महागाईने (Inflation) त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांची यातून सुटका होण्याची आशा अजूनही दिसत नाही. RBI च्या चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) तीन दिवसीय बैठकीनंतर आज रेपो रेट (Repo Rate) वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेपो रेटमध्ये 50 बेसिक पॉईंट्सची वाढ करण्यात आली आहे, त्यामुळे तो आता 4.90 टक्क्यांवर पोहोचला आहे. RBI च्या या निर्णयामुळे सर्वच बँकाचे कर्जाचे व्याजदार पुन्हा वाढतील. त्यामुळे EMI चा अतिरिक्त बोजा सर्वसामान्यांवर पडणार आहे.

जाहिरात

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) म्हणाले की, बैठकीत धोरणात्मक व्याज दर किंवा रेपो दर 50 बेस पॉइंट्स किंवा 0.50 टक्के वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. म्हणजेच रेपो दर 4.40 वरून 4.90 पर्यंत वाढला आहे. ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी RBI चा नवीन नियम लवकरच लागू होणार; काय आहे नियम? मे महिन्याच्या सुरुवातीला, देशातील वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी, आरबीआयने पूर्व सूचना न देता एमपीसीची बैठक आयोजित केली होती आणि त्यात रेपो दरात 0.40 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली होती. यानंतर, 2020 पासून 4 टक्क्यांच्या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर राहिल्यानंतर, हे दर अचानक 4.40 टक्क्यांपर्यंत वाढले. या वाढीनंतर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरनेही जूनमध्ये होणाऱ्या बैठकीत रेपो दरांमध्ये आणखी वाढ करण्याचे संकेत दिले होते. इथेनॉल मिश्रित पेट्रोल नेमकं कसं असतं? वाहनांसाठी ते फायदेशीर की हानिकारक? सर्वसामन्यांवर काय परिणाम होणार? रेपो दरात वाढ झाल्याने कर्जाचा EMI वाढत असल्याने बँकांच्या कर्जाचा खर्च वाढणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून बँका ज्या दराने कर्ज घेतात तो दर म्हणजे रेपो दर. या वाढीमुळे बँकांच्या कर्जाचा खर्च वाढेल आणि त्याचा बोजा ग्राहकांवर पडेल. त्यामुळे तुमचे गृह कर्ज, वाहन कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज हे सर्व आगामी काळात महाग होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: rbi , repo rate
  • First Published :
जाहिरात
जाहिरात