मराठी बातम्या /बातम्या /मनी /UAN नंबर विसरलात? घरबसल्या चेक करता येईल PF बॅलेन्स, काढता येतील पैसे; पाहा संपूर्ण प्रक्रिया

UAN नंबर विसरलात? घरबसल्या चेक करता येईल PF बॅलेन्स, काढता येतील पैसे; पाहा संपूर्ण प्रक्रिया

तुमच्या प्रॉविडेंट फंडमधून (Provident Fund) रक्कम काढायची असेल, पण UAN विसरला असाल, तर चिंतेचं कारण नाही. EPFO ने यासाठी आपल्या सिस्टममध्ये आवश्यक बदल केले आहेत, ज्यामुळे अकाउंटहोल्डर विना UAN आपल्या पीएफ अकाउंटचा बॅलेन्स चेक करू शकतो. तसंच यूएएनशिवाय अकाउंटमधूम पैसेही काढता येऊ शकतात.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 22 जून : कोरोना संकट काळात जर तुम्हाला तुमच्या प्रॉविडेंट फंडमधून (Provident Fund) रक्कम काढायची असेल, पण युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) विसरला असाल, तर चिंतेचं कारण नाही. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनने (EPFO) यासाठी आपल्या सिस्टममध्ये आवश्यक बदल केले आहेत, ज्यामुळे अकाउंटहोल्डर विना UAN आपल्या पीएफ अकाउंटचा बॅलेन्स चेक (PF Balance Check) करू शकतो. तसंच यूएएनशिवाय अकाउंटमधून पैसेही काढता येऊ शकतात. यूएएन 12 अंकी यूनिक नंबर असतो, जो ईपीएफओ सब्सक्रायबर्सला दिला जातो. हा नंबर कधीही बदलत नाही.

UAN शिवाय असा चेक करा बॅलेन्स -

- UAN शिवाय पीएफ बॅलेन्स चेक करण्यासाठी सर्वात आधी epfindia.gov.in वर लॉगइन करा.

- त्यानंतर होम पेजवर दिलेल्या Click Here to Know your EPF Balance वर क्लिक करा.

- सिस्टम epfoservices.in/epfo/ वर रिडायरेक्ट करेल. त्यानंतर Member Balance Information टॅबवर क्लिक करावं लागेल.

- यानंतर मेंबरला आपलं राज्य निवडावं लागेल आणि आपल्या ईपीएफओ ऑफिस लिंकवर क्लिक करावं लागेल.

- त्यानंतर पीएफ अकाउंट नंबर, नाव, रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाकावा लागेल.

- सर्व माहिती भरल्यानंतर Submit वर क्लिक करा. स्क्रिनवर पीएफ बॅलेन्स दिसेल.

(वाचा - वाहनचालकांनो लक्ष द्या!Driving License आणि PUC सर्टिफिकेटबाबत ही अपडेट वाचली का?)

PF अकाउंटमधून पैसे कसे काढाल -

- EPFO वेबसाईट epfindia.gov.in/memberinterface/ वर जा.

- तुमचा UAN नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉगइन करा. मॅनेजवर क्लिक करा.

- KYC ऑप्शनवर आपली माहिती चेक करा. ऑनलाईन सर्विसवर क्लिक करा. एक ड्रॉप मेन्यू ओपन होईल.

- यात क्लेमवर (Claim) क्लिक करा. आपला क्लेम फॉर्म सबमिट करण्यासाठी Proceed For Online Claim वर क्लिक करा.

- I Want To Apply For मध्ये जा. यात full EPF Settlement, EPF Part withdrawal (loan/advance) किंवा pension withdrawal ऑप्शन निवडा. हे भरल्यानंतर जवळपास 5 ते 10 दिवसांत ईपीएफओवर रजिस्टर्ड बँक अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर होतील. याची माहिती तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर SMS द्वारे मिळेल.

(वाचा - Online Financial Fraud झालाय? घाबरू नका, वाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल)

UAN शिवाय कसे काढला येतील पैसे -

विना UAN पीएफ अकाउंटमधून पैसे काढण्यासाठी सब्सक्रायबर्सला पीएफ फॉर्म भरावा लागेल. तो फॉर्म स्थानिक पीएफ ऑफिसमध्ये जमा करावा लागेल. मेंबरला यासाठी ऑनलाईन आधार बेस्ड क्लेम फॉर्म किंवा नॉन-आधार क्लेम फॉर्म डाउनलोड करावा लागेल. हा फॉर्म भरुन युजर आपल्या पीएफ अकाउंटमधून अर्धी किंवा पूर्ण रक्कम काढू शकतात.

First published:

Tags: Epfo news, PF Amount, Pf news, PF Withdrawal