मुंबई, 19 जून : पैसे कमवण्यासाठी लोक वेगवेगळ्या बिझनेस आयडिया शोधत असतात. अजून उन्हाळा सुरू आहेच. पाऊस सुरू झाला तरी उकाडा हा असतोच. त्यामुळे जॅम आणि जेलीचा बिझनेस उत्तम आहे. रेडी टु इट प्राॅडक्ट्सची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर जॅम आणि स्क्वाॅशची बाजारपेठ वाढतेय. या व्यवसायासाठी तुम्हाला सरकारकडून कर्जही मिळू शकतं. किती गुंतवणूक करावी लागेल? तुम्हाला फ्रुट जॅम, स्क्वाॅश आणि काॅकटेलचं युनिट सुरू करायचं असेल तर तुमच्याकडे 9.08 लाख रुपये हवेत. पूर्ण प्राॅजेक्टची किंमत 36.30 लाख रुपये आहे. यात 12 लाख रुपये प्लांट मशीनरी, 1.5 लाख रुपये फर्निचर आणि इतर गोष्टींसाठी 1.2 लाख रुपये आणि वर्किंग कॅपिटल म्हणून 21.60 लाख रुपये यांचा समावेश आहे. यापैकी 27.23 लाख रुपयांचं बँकेकडून कर्ज मिळेल. आता विमान प्रवास झाला स्वस्त, ‘या’ आहेत धमाकेदार ऑफर्स या मशीन्सची पडेल गरज तुम्ही युनिट सुरू करणार असाल तर तुम्हाला अनेक प्रकारच्या मशीन्सची गरज लागेल. पल्पियर, ज्युस एक्सट्रेक्टर, मिक्सर, ग्राइंडर, सलाइसर, कॅप सीलिंग मशीन, बाॅटल वाॅशिंग मशीन, कार्टुन सीलिंग मशीन यांची गरज लागेल. या प्रकारे तुम्हाला जवळजवळ 30 टन प्राॅडक्शन मिळू शकतं. यापेक्षा मोठं युनिट सुरू करायचं असेल तर पूर्ण आॅटोमेटिक प्राॅडक्शन युनिट सुरू करावं लागेल. आर्थिक गुंतवणुकीत स्त्री पुरुषापेक्षा कशी असते वेगळी? किती होईल फायदा? पहिल्या वर्षात तुम्ही तुमच्या क्षमतेच्या 60 टक्केच वापर केलात, तर एकूण विक्री 64.80 लाख रुपये होईल. यात कच्चा माल आणि इतर खर्च 44.64 लाख रुपये असेल. याप्रकारे एकूण मार्जिन 20.16 लाख रुपये असेल, ओव्हरहेड 3.90 लाख रुपये आणि कर्जावर व्याज 2.72 लाख, डेप्रिसिएशन 3.60 लाख रुपये वजा केले तर तुमचा एकूण नफा 9.93 लाख रुपये होईल. या अहवालात असं म्हटलंय की तुम्ही तुमची 70 टक्के क्षमता वापरलीत तर 14.13 लाख रुपये एकूण फायदा होईल. बँकांमध्ये नोकरीची मोठी संधी, ‘असा’ करा अर्ज इथे मिळेल मदत तुम्ही http://www.udyamimitra.in या पोर्टलची मदत घेऊ शकता. तिथे मशीनरी कुठून खरेदी करायची इथपासून सगळी माहिती मिळेल. SPECIAL REPORT: सांगलीचा भन्नाट ‘फुंगसुक वांगडू’, मराठी तरुणाच्या नावावर आहेत 75
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







