मुंबई, 24 जून : तुम्ही कर्ज घेऊन कार खरेदी केलीयत आणि ती कार तुम्हाला आता विकायची आहे. तुम्ही आधीच कर्ज चुकवलं असेल तर ठीक. पण कर्ज फेडत असताना कार विकली तर ते कर्ज तुम्हाला ट्रान्सफर करावं लागेल. त्यासाठी काय करावं लागेल ते पाहा -
तुमचं कर्जाचं अॅग्रीमेंट चेक करा
पहिल्यांदा हे तपासून पाहा की तुम्ही तुमचं कर्ज ट्रान्सफर करू शकताय की नाही. याबाबत तुम्ही बँकेकडून माहिती घ्या. कर्ज ट्रान्सफर करता येत नसेल तर मग कठीण आहे.
BSNL तोट्यात, दीड लाख कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसेच नाहीत
कर्ज योग्य व्यक्तीला ट्रान्सफर करा
कर्ज ट्रान्सफर करताना तो व्यक्ती विश्वसनीय आहे की नाही ते पाहा. बँक कर्ज ट्रान्सफर तेव्हाच करते, जेव्हा घेणाऱ्याचा क्रेडिट स्कोअर चांगला आहे. म्हणजे ते कर्ज तो चुकवेल.
रेल्वेत सुरू आहे 2150 जागांवर भरती, 'या' पदांसाठी मागवलेत अर्ज
तुम्ही योग्य खरेदीदार निवडा. कारण कर्जामुळे तुमच्या कारची किंमतही कमी होते. जी व्यक्ती तुम्हाला योग्य किंमत देईल, भविष्यात कर्ज चुकवेल, असाच व्यक्ती निवडा.
कारचं रजिस्ट्रेशन बदला
कर्ज ट्रान्सफर करताना तुम्हाला रजिस्ट्रेशन त्याच व्यक्तीच्या नावे करावं लागेल. कारचं रजिस्ट्रेशन खरेदीदाराच्या नावावर असल्यानं बँक त्याला कर्ज ट्रान्सफर करते. त्यासाठी तुम्हाला ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
भारतात 1.1 कोटी महिलांची नोकरी धोक्यात, जाणून घ्या कारणं
इन्शुरन्स पाॅलिसी बदला
कर्ज ट्रान्सफर करताना तुम्हाला इन्शुरन्स कंपनीची परवानगी घ्यावी लागेल. तुम्हाला इन्शुरन्स पाॅलिसीत बदल करावा लागेल. म्हणजे कार विकल्यानंतर तुम्हाला प्रीमियम भरावा लागणार नाही. कार जो खरेदी करेल त्याला प्रीमियम भरावा लागेल.
फीबद्दल माहिती घ्या
बँक कर्ज ट्रान्सफर करताना फी घेतात. तुमचं शिल्लक असलेलं कर्ज किती आहे, त्यावरून हे चार्जेस घेतले जातात.
'त्या' दिवशी मुथ्थुट फायनान्समध्ये तरुणाची कशी झाली हत्या?नांगरे पाटलांचा खुलासा